Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
IND W vs THA W : शेफालीची बॅट गरजली, दीप्ती-नंदनीच्या गोलंदाजीने थायलंड हादरलं! आशिया कपमध्ये भारताचा थरारक श्रीगणेशा

IND W vs THA W : शेफालीची बॅट गरजली, दीप्ती-नंदनीच्या गोलंदाजीने थायलंड हादरलं! आशिया कपमध्ये भारताचा थरारक श्रीगणेशा

ABP माझा 2 weeks ago

India Beat Thailand by 94 Runs in Women's Asia Cup 2026 : महिला आशिया कप 2026 मध्ये भारतीय महिला संघाने दणदणीत विजयासह आपल्या मोहिमेला सुरुवात केली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने पहिल्याच सामन्यात थायलंड महिला संघाचा तब्बल 94 धावांनी पराभव केला.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 9 गडी गमावून 159 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात थायलंडचा संपूर्ण संघ अवघ्या 65 धावांवर गारद झाला. भारताच्या विजयात फलंदाजीत शेफाली वर्माने तुफानी अर्धशतक झळकावत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर गोलंदाजीत दीप्ती शर्मा आणि नंदनी शर्मा यांनी प्रत्येकी तीन विकेट घेत थायलंडच्या फलंदाजीची कंबर मोडली.

थायलंड संघाने जिंकली नाणेफेक अन्...

या सामन्यात थायलंडची कर्णधार नारुएमोल चाईवाई हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियाला प्रथम फलंदाजी करावी लागली. भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संघाला नियमित अंतराने धक्के बसत राहिले. तरीही शेफाली वर्माच्या आक्रमक खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकांत 9 विकेट्सच्या मोबदल्यात 159 धावा उभारल्या.

शेफालीचा धमाका; 36 चेंडूत 64 धावा

भारताच्या डावात सर्वाधिक चर्चा शेफाली वर्माच्या फलंदाजीची झाली. शेफालीने अवघ्या 26 चेंडूंमध्ये चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरही तिचा आक्रमक अंदाज कायम राहिला. अखेर ती 36 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 64 धावा करून बाद झाली. तिचा स्ट्राइक रेट तब्बल 177.77 इतका राहिला. शेफालीच्या या खेळीमुळे भारताला मोठी धावसंख्या उभारण्याचा मजबूत पाया मिळाला. दुसरीकडे स्मृती मानधनाने सुरुवातीपासूनच आक्रमक फटके खेळत 10 चेंडूंमध्ये 4 चौकारांच्या मदतीने 19 धावा केल्या. मात्र, धाव घेताना ती धावबाद झाली आणि भारताला पहिला धक्का बसला.

यानंतर प्रतिका रावलने 18 चेंडूंमध्ये 2 चौकार आणि 1 षटकारासह 22 धावा केल्या. तिला सुलीपोर्न लाओमीने बाद केले. कर्णधार हरमनप्रीत कौरलाही मोठी खेळी करता आली नाही. ती अवघ्या 5 धावांवर लाओमीची शिकार ठरली.

ऋचा घोष खातेही न उघडता बाद

भारताची यष्टीरक्षक फलंदाज ऋचा घोष या सामन्यात विशेष योगदान देऊ शकली नाही. ती खातेही न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर भारतीय फलंदाजांनी छोट्या-छोट्या योगदानाच्या माध्यमातून संघाची धावसंख्या वाढवली. भारतीय फूलमालीने 20 धावा, तर क्रांती गौडने 15 धावांचे योगदान दिले. दीप्ती शर्माने आपल्या 150व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात 5 धावा केल्या.

160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना थायलंडची दाणादाण

भारताने दिलेल्या 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या थायलंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांसमोर अजिबात टिकाव धरता आला नाही. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत थायलंडच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. अवघ्या 16.1 षटकांत थायलंडचा संपूर्ण संघ 65 धावांवर ऑलआऊट झाला. थायलंडकडून नन्नापत कोंचारोएनकाईने 41 धावांची झुंजार खेळी केली. मात्र, तिच्याशिवाय एकाही फलंदाजाला 6 धावांचा टप्पा पार करता आला नाही. त्यामुळे भारताने तब्बल 94 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

दीप्ती आणि नंदनीची गोलंदाजीत कमाल

भारताच्या विजयात गोलंदाजांनी निर्णायक भूमिका बजावली. दीप्ती शर्माने 3 विकेट्स घेतल्या, तर नंदनी शर्मानेही 3 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यांच्यासोबत श्री चरणीने 2 विकेट्स, तर क्रांती गौडने 1 विकेट घेत थायलंडचा डाव गुंडाळला.

Abhishek Sharma : 6 चौकार 7 षटकार, अभिषेक शर्माची शेर ए पंजाब टी 20 लीगमध्ये तुफान फटकेबाजी, 26 बॉलमध्ये 77 धावांची खेळी

Author : किरण महानवर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha