Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
इन्स्टाग्रामवरील फेमस रिलस्टार, हॉटेल ग्रामपंचायतची मालकीण, रोहिणी पाराध्येनं ज्या किचनमधून रिल्स बनवले तिथेच आयुष्य संपवलं

इन्स्टाग्रामवरील फेमस रिलस्टार, हॉटेल ग्रामपंचायतची मालकीण, रोहिणी पाराध्येनं ज्या किचनमधून रिल्स बनवले तिथेच आयुष्य संपवलं

ABP माझा 2 weeks ago

 Mangalwedha Reel Star Rohini Paradhye Ends Life: सोशल मीडियाच्या जगात रिल्स बनवून अल्पावधीत लोकप्रियता मिळवणाऱ्या रीलस्टार रोहिणी निलेश पारामध्ये हिनं आत्महत्या केलीय. प्रसिद्ध रिल स्टार असलेल्या रोहिणी यांच्या आत्महत्येच्या वृत्तानं खळबळ माजली आहे.

 रिल स्टार रोहिणी नीलेश पाराध्ये (Rohini Paradhye) हिनं अत्यंत धक्कादायक पद्धतीनं आत्महत्या केली आहे.

स्वतःच्या हॉटेलच्या ज्या स्वयंपाक घरात तिनं अनेक रिल्स बनवले, त्याच स्वयंपाक घरात गळफास घेऊन रोहिणीनं आपल्या आयु्ष्याचा दोर कापला आहे.

सोलापूर (Solapur Crime) जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का दिला आहे.

रोहिणी आणि त्यांचे पती निलेश पाराध्ये हे सोशल मीडियावर सक्रिय होते. हॉटेलच्या रील्समुळे जिल्ह्यातील हजारो लोकांच्या मनात त्यांनी स्थान मिळवलं होतं.

याच लोकप्रियतेच्या जोरावर त्यांनी रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत 'हॉटेल ग्रामपंचायत' हा व्यवसाय यशस्वीपणे सुरू केला होता. मात्र, हसत-खेळत सुरू असलेला संसार आणि भरभराटीला आलेला व्यवसाय सोडून रोहिणीनं अचानक उचललेल्या टोकाच्या पावलामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

ब्रह्मपुरी येथील 'हॉटेल ग्रामपंचायत'च्या स्वयंपाकघरात मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास रोहिणी यांनी पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्यानं गळफास घेतल्याचे समोर आले.

ही घटना उघडकीस आल्यानंतर पती निलेश यांनी त्यांना तातडीने मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

रोहिणीनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आलेलं नाही. याबाबत मंगळवेढा पोलीस अधीक्षक तपास करत आहेत.

रोहिणी आणि नीलेश पाराध्ये हे दाम्पत्य गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होते.

ब्रह्मपुरी येथील आपल्या हॉटेलच्या स्वयंपाकघरात विविध गावरान खाद्यपदार्थ तयार करतानाचे त्यांचे व्हिडीओ इन्स्टाग्राम आणि इतर प्लॅटफॉर्मवर कमालीचे लोकप्रिय झाले होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha