Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Isha Ambani: सोन्याच्या धाग्यांनी विणलेली साडी,  आईच्या ज्वेलरीनं बनलेलं डायमंड ब्लाऊज अन् हातात आंब्याची पर्स, अंबानींच्या लेकीनं मेट गालाचं रेड कार्पेट गाजवलं

Isha Ambani: सोन्याच्या धाग्यांनी विणलेली साडी, आईच्या ज्वेलरीनं बनलेलं डायमंड ब्लाऊज अन् हातात आंब्याची पर्स, अंबानींच्या लेकीनं मेट गालाचं रेड कार्पेट गाजवलं

ABP माझा 2 weeks ago

 Isha Ambani Golden Saree Diamond: मुकेश आणि नीता अंबानी (Isha Ambani) यांची मुलगी ईशा अंबानीने, तिच्या मेट गाला 2026च्या (Met Gala 2026) लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं. तिचा रॉयल रिच लूक पाहायला मिळाला.

भारतीय फॅशन आणि कलेला प्रोत्साहन देण्यासाठी तिनं हा खास लूक कॅरी केला.

फॅशन जगतातील या मोठ्या इव्हेंटमध्ये ईशा अंबानीने गौरव गु्प्ता यांनी डिझाइन केलेला एक खास साडी नेसली होती. ज्यावर हाताने रंगवलेली पिछवाई - शैलीतील नक्षी आणि गौरव गुप्ता यांच्या खास शैलीतील आकर्षक केप होती. सध्या ईशा अंबानीच्या मेट गालातील फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईशा अंबानीने मेट गाला 2026 मध्ये नेसलेली साडी, ही रिलायन्स रिटेलने सुरू केलेल्या, ब्रँड स्वदेशच्या कारागिरांनी शुद्ध सोन्याच्या धाग्यांनी विणली आहे. या खास आऊटफिटला 50 हून अधिक कारागिरांनी 1200 तासांहून अधिक वेळात तयार केली आहे.

ज्यात, टेक्सटाइल मास्टरी, ज्वेलरी क्राफ्ट्समॅनशिप आणि ट्रेडिशनल टेक्निकचा वापर करुन एक अद्वितीय रचना तयार केली आहे.

ईशा अंबानीची साडी ही सोन्याच्या धाग्यांनी विणली आहे. साडीसह तिचा ब्लाऊजही खूप खास आहे. ईशा अंबानीचा ब्लाऊज हा खऱ्या हिराऱ्यांनी जडवला आहे. ब्लाऊजच्या पाठीमागे निजामांच्या दागिन्यांच्या संग्रहातील एक मौल्यवान ऐतिहासिक दागिना लावला आहे.

हिरव्या रंगाचे हिरे अतिशय सुंदर दिसत होते. रेड कार्पेटवर वोगला दिलेल्या मुलाखतीत ईशा अंबानी म्हणते, 'हा सुंदर ब्लाऊज माझ्या आईच्या दागिन्यांनी सजवला आहे'.

डिझायनर गौरव गुप्ताने इन्स्टाग्रामवर ईशा अंबानीच्या मेट गालामधील लूकचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना कॅप्शनही दिलं आहे. त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'या ब्लाऊजमध्ये 1800 कॅरेटहून अधिक हिरे, पाचू, कुंदन आणि पोलकी जडवलेले आहेत. जे याला वारसा आणि एका फॉर्मचे जिवंत रुप देते'. असं त्यानं पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

ईशा अंबानीच्या मेट गालातील लूकची खासियत इथेच संपत नाही. तिनं सुंदर साडी आणि दागिन्यांसह एक पीस ऑफ आर्ट देखील कॅरी केला होता. ईशा अंबानीने सुबोध गुप्ताने तयार केलेला मँगो स्कल्पचर कॅरी केला. 'फॅशन इज आर्ट' या थीमला ही पर्स पूर्ण करते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha