Israel Attack Lebanon: अमेरिका आणि इराण (US Iran War) यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर इस्त्रायलनं मात्र आक्रमक भूमिका कायम ठेवली. इस्त्रायलनं लेबनॉनवर जोरदार हल्ले (Israel Attack Lebanon) केले आहेत.
या हल्ल्यात 254 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. तर, 1165 पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. इस्त्रायलकडून लेबनॉनची राजधानी बैरूतवर दिवसभर हल्ले करण्यात आले. या हल्ल्याच्या भीषणतेची दृष्येदेखील समोर येत आहे.
इस्त्रायलकडून लेबनॉनवर सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे इराण आक्रमक झाला आहे. इराणने या कारवायांवर तीव्र नाराजी व्यक्त करत थेट इशाराच दिला आहे. तसेच, लेबनॉनमध्ये युद्धविराम झाल्याशिवाय इराण अमेरिकेसोबत होणाऱ्या इस्लामाबादमधील चर्चेत सहभागी होणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. इराणच्या हवाई क्षेत्रात शत्रू देशांच्या विमानांनी प्रवेश केल्यास ते युद्धविरामाचं उल्लंघन मानलं जाईल, असा इशारा इराणनं अमेरिकेला दिला आहे. दरम्यान इराणनं होर्मुजमधील तेल टँकरची वाहतूक रोखून धरल्याची माहिती समोर आली आहे. इराणच्या 'फार्स' वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिलं असून, या निर्णयामुळे जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Israel Attack Lebanon)
गरज भासल्यास पुन्हा युद्ध सुरू करण्याची तयारी- बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu On US Iran War)
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोठं वक्तव्य केल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत सहमतीने युद्धविराम झाल्याचं म्हटलं आहे. मात्र, हिजबुल्लाहविरोधातील कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही बेंजामिन नेतन्याहू यांनी दिला. गरज भासल्यास पुन्हा युद्ध सुरू करण्याची तयारी असल्याचं नेतन्याहू यांनी स्पष्ट केलं. अजूनही अनेक लक्ष्य गाठायचे बाकी असल्याचं सांगत इस्रायल आपली सर्व उद्दिष्टं पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, इराणची क्षेपणास्त्र बनवण्याची क्षमता संपवल्याचाही दावा बेंजामिन नेतन्याहू यांनी केला. (Benjamin Netanyahu On US Iran War)
इराणची पुन्हा आक्रमक भूमिका- (Iran Israel War)
इराणसोबत युद्धविरामाचा करार झाल्यानंतरही इस्रायलने लेबनॉनवरील हल्ले सुरूच ठेवले असून, बेरूत शहरावर जोरदार हवाई हल्ल्यांची मालिका पाहायला मिळाली. राजधानीच्या आकाशात काळा धूर पसरल्याचे दृश्य समोर आले आहे. दरम्यान, अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमती झाली असली तरी या कराराबाबत अजूनही अनेक बाबी स्पष्ट नाहीत. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी हा करार 'नाजूक' असल्याचे म्हटले आहे. युद्धविराम जाहीर झाल्यानंतर काही तासांतच नव्या हल्ल्यांच्या बातम्या समोर आल्याने या करारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर लेबनॉनवरील हल्ले थांबले नाही तर आम्ही प्रतिहल्ला करू अशी भूमिका इराणनं घेतली आहे. तसंच जर लेबनॉनवरील हल्ले थांबले तरच ते पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चर्चेत सहभागी होतील. अशी भूमिका इराणनं घेतल्याची माहिती आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद- (Strait of Hormuz Close )
फार्स वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार इस्त्रायलकडून लेबनॉनमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. यामुळं इराणच्या नौदलानं होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी परवानगीशिवाय पार करु नये अशी धमकी देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. इराणकडून या सर्व घटनाक्रमानंतर जहाजमालकांना इशारा देण्यात आलाय, परवानगीशिवाय जहाज होर्मुझमधून पार करण्याचा प्रयत्न करु नये. परवानगीशिवाय होर्मुझची सामुद्रधुनी पार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहाजांवर हल्ले करुन ती जहाजं नष्ट केली जातील. अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण आहे.
अमेरिका इराण युद्धात पाकिस्तानची मध्यस्थी Special Report:
युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा
Author : मुकेश चव्हाण

