Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसचा आणखी पाय खोलात, 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडचण वाढणार

Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसचा आणखी पाय खोलात, 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडचण वाढणार

ABP माझा 1 week ago

Jacqueline Fernandez Money Laundering: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 200 कोटींच्या फसवणूक प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा खटला चालणार आहे.

दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने 200 कोटी रुपयांच्या कथित फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयानं सुकेश चंद्रशेखर, त्याची पत्नी लीना मारिया पॉल, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि इतर आरोपींविरोधात आरोप निश्चित केले आहेत.

200 कोटी रुपयांच्या कथित फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. पटियाला हाऊस न्यायालयाने या प्रकरणात घेतलेल्या निर्णयामुळे, जॅकलिन फर्नांडिसविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा अंतर्गत नियमित खटला चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणात आता न्यायालयीन सुनावणी पुढील टप्प्यात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

याशिवाय, न्यायालयानं महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या प्रकरणातही सुकेश चंद्रशेखर, लीना मारिया पॉल आणि इतर आरोपींविरोधात आरोप निश्चत केले आहेत. दरम्यान, न्यायालयाने सर्व आरोपींना औपचारिक स्वाक्षरी करण्यासाठी 3 जून रोजी कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

जॅकलिनच्या अडचणीत वाढ

काही महिन्यांपूर्वी जॅकलिन फर्नांडिझने या प्रकरणात अर्ज दाखल करुन सुकेश चंद्रशेखरविरोधात माफीची साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली होती. तपास यंत्रणांना सहकार्य करण्यास तसेच सत्य उघडकीस आणण्यास मदत करण्याची इच्छा तिनं व्यक्त केली होती. माफीच्या साक्षीदाराच्या दर्जा दिल्यास या प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची माहिती समोर आणण्यास मदत करणार असल्याचंही अभिनेत्रीनं म्हटलं होतं. तिच्या या निर्णयामुळे या प्रकरणात अनेक माहिती उघड होण्याची शक्यता होती. मात्र, न्यायालयाने तिने दाखल केलेला अर्ज फेटाळला.

नेमकं प्रकरण काय?

अदिती सिंहच्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर दाखल केली होती. तपास यंत्रणांनुसार, कथित फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखरवर, कोट्यवधी रुपये उकळणे आणि त्या पैशांचा विविध मार्गांनी वापर केल्याचा आरोप आहे. ईडीचा आरोप आहे की, सुकेशकडून जॅकलिनला विविध महागडे भेटवस्तू मिळाले आहेत. दरम्यान, अभिनेत्रीने कायम हेच सांगितले की, तिला या कथित गुन्हेगारीच्या संबंधित उत्पन्नाच्या स्त्रोताबद्दल माहिती नव्हते.

दरम्यान, या प्रकरणात आता जॅकलिनला 3 जून रोजी न्यायालयात हजर राहावे लागेल. जॅकलीन आता हे प्रकरण कसे हाताळते? हे पाहणं महत्त्वाचे आहे.

इतर बातम्या:

'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्यावर टोळक्याकडून प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न, रात्रीच्या सुमारास नक्की काय घडलं?

Author : एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha