Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Jalgaon Accident: भीषण अपघात! भरधाव कारने तीन महिलांना अक्षरशः हेवेत उडवलं; एका महिलेचा जागीच मृत्यू,जळगावच्या चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावरील घटना

Jalgaon Accident: भीषण अपघात! भरधाव कारने तीन महिलांना अक्षरशः हेवेत उडवलं; एका महिलेचा जागीच मृत्यू,जळगावच्या चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावरील घटना

ABP माझा 5 days ago

Jalgaon Accident News : जळगावजिल्ह्याच्या चाळीसगावमधूनएकभीषणअपघाताचीबातमीसमोरआलीआहे. चाळीसगाव मालेगाव रस्त्यावर भीषण अपघात झालाआहे. यात भरधाव कारने बिलाखेड गावाजवळ तीन महिलांना अक्षरशः उडवले आहे . या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दोन महिला अतीगंभीरित्या जखमी झाल्या असल्याची माहिती आहे . तर हा अपघात एवढा भयंकर होता की मयत महिला कारमध्ये पूर्णपणे अडकून पडलेली होती.

घटनेचीमाहितीमिळताचपोलीसघटनास्थळीदाखलहोऊनपुढीलकारवाईसुरुकरण्यातआली. तरजखमींनातातडीनेरुग्णालयातउपचारासाठीदाखलकरण्यातआले.

Jalgaon Accident News : बिलाखेड गावातील संतप्त गावकऱ्यांकडून चाळीसगाव मालेगाव रस्ता रोको आंदोलन

दरम्यान, याअपघातानंतर बिलाखेड गावातील संतप्त गावकऱ्यांनी चाळीसगाव मालेगाव रास्ता रोको आंदोलन सुरुकेलं. सोबतच रस्त्यावर स्पीड ब्रेकर टाकण्यासह सुरक्षा फलक लावण्याचीमागणी गावकऱ्यांकडूनकरण्यातआली. या रस्ता रोको आंदोलनामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. परिणामी घटनास्थळी मोठी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. सध्यापरिसराततणावपूर्णशांतातआहे. मात्रयादुर्दैवीअपघातानेपरिसरातमोठीखळबळउडालीआहे.

Jalgaon News: ऐन सणासुदीत साखरेच्या दरवाढीविरोधात समाजवादी पार्टीचे आंदोलन; साखर वाटून सरकारचा निषेध

सणासुदीच्या काळात साखरेच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले असून, साखरेचे भाव तातडीने नियंत्रणात आणावेत, अशी मागणी करत समाजवादी पार्टीने राज्य सरकारविरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. जळगाव शहरातील टावर चौकात समाजवादी पार्टीतर्फे नागरिकांना साखरेचे वाटप करून सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. जिल्हाध्यक्ष अशपाक पटेल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

सणासुदीच्या दिवसांमध्ये साखरेची मोठ्या प्रमाणात मागणी असताना दरवाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. त्यामुळे राज्य सरकारने साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण आणून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी समाजवादी पार्टीतर्फे करण्यात आली. यावेळी नागरिकांनाही साखरेचे वाटप करण्यात आले.

इतर महत्वाच्या बातम्या

Author : चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha