Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Jasprit Bumrah Ind vs SL Test : ...अन् भारताचं सर्वात मोठं शस्त्रच निकामी झालं! श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेतून जसप्रीत बुमराह OUT, नेमकं काय घडलं?

Jasprit Bumrah Ind vs SL Test : ...अन् भारताचं सर्वात मोठं शस्त्रच निकामी झालं! श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेतून जसप्रीत बुमराह OUT, नेमकं काय घडलं?

ABP माझा 1 month ago

 श्रीलंकाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
 संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या दोन्ही सामन्यांमधून बाहेर पडला आहे.

बुमराहचे संघाबाहेर जाणे हा भारतासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.

 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, बुमराहच्या डाव्या पायाच्या गुडघ्यात अजूनही वेदना होत आहेत.

त्यामुळे कोणताही धोका न पत्करता, संघ व्यवस्थापन आणि वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.

आता त्याच्या जागी संघात कोणत्या खेळाडूला संधी दिली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीसाठी भारताचा संघ - शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सरांश जैन.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha