Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Jayant Patil on Petrol Diesel: जयंत पाटलांनी फडणवीसांना सांगितला पेट्रोल-डिझेलचे दर एका झटक्यात कमी करण्याचा मार्ग, पत्र पाठवून म्हणाले...

Jayant Patil on Petrol Diesel: जयंत पाटलांनी फडणवीसांना सांगितला पेट्रोल-डिझेलचे दर एका झटक्यात कमी करण्याचा मार्ग, पत्र पाठवून म्हणाले...

ABP माझा 2 weeks ago

मुंबई : देशभरात इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. याबाबत अनेक ठिकाणी आंदोलने (Jayant Patil on Petrol Diesel)होत आहेत, त्याचबरोबर विरोधकांनी इंधनाच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीबाबत सत्ताधारी पक्षांवर हल्लाबोल केला आहे.

राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवर आकारत असलेला व्हॅट आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील (Jayant Patil on Petrol Diesel) यांनी व्यक्त केलं आहे. जयंत पाटलांनी सोशल मिडीयावर पोस्ट लिहली आहे. राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवर आकारत असलेला व्हॅट आणि सरचार्ज रद्द करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहलं आहे. (Jayant Patil on Petrol Diesel)

जयंत पाटलांनी सोशल मिडीया पोस्टमध्ये म्हटलंय की, राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवर आकारत असलेला व्हॅट आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात. यामुळे केवळ वाहनधारकांनाच नव्हे, तर वाहतूक, शेती आणि उद्योग क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळेल. कठीण आर्थिक परिस्थितीत नागरिकांच्या हिताचा विचार करून राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महोदयांना केली. सलग दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून नागरिकांना तातडीने दिलासा देण्याची गरज आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Jayant Patil on Petrol Diesel: पत्रामध्ये काय म्हणालेत जयंत पाटील?

आखाती देशातील युद्धामुळे महाराष्ट्रासह देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रचंड ताण येत आहे. महागाई प्रचंड वाढली आहे, खाद्य तेल, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याचा फटका थेट सामान्य माणसाला बसत आहे. त्यात भरीस भर पेट्रोल डिझेलचे वाढणारे दर घालत आहेत. केंद्र सरकारकडून वारंवार पेट्रोल व डिझेलचे दर वाढवले जात आहे. आज पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा वाढले आहेत. पेट्रोल २ रुपये ६१ पैशांनी तर डिझेल २ रुपये ७१ पैशांनी वाढले आहे. मागील १० दिवसांत सलग चौथ्यांदा ही वाढ केली जात आहे. आज घडीला मुंबईत १११.१२ रू. प्रति लिटर पेट्रोल मिळत आहे तर डिझेल ९६.८६ रु. प्रति लिटर मिळत. त्यामुळे या महागाईमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. या संकटसमयी आपण पुढाकार घेऊन नागरिकांना दिलासा दिला पाहिजे.

राज्य सरकार इंधनावर व्हॅट आणि सरचार्ज आकारते जे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू आहे. राज्यात पेट्रोलवर अंदाजे २५% व्हॅट ₹१०.१२ प्रति लिटर सरचार्ज लावला जातो तर डिझेलवर अंदाजे २४% व्हॅट ₹३.०० प्रति लिटर सरचार्ज लावला जातो. राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज रद्द करून टाकावा. यामुळे आज १११ रुपयांना मिळणारे पेट्रोल व डिझेल थेट ७०-८० रुपयात मिळू शकते. असे झाल्यास या कठीण काळात नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. आपण या सुचनेचा सकारात्मक विचार कराल व तात्काळ पेट्रोल डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज रद्द करून नागरिकांना दिलासा द्याल अशी अपेक्षा करतो.

Author : अंकिता खाणे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha