Josh Hazlewood:आयपीएल फायनलमध्ये विकेट घेण्याची परंपरा कायम राखताना आरसीबीच्या जोश हेझलवुडने अनोखा पराक्रम आपल्या नावे केला आहे. आज फायनलमध्ये त्याने गुजरातचा कॅप्टन शुभमन गिलला बाद करत पहिला धक्का दिला.
हेझलवुड रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडील (RCB) महत्वाचं अस्त्र आहे.
जोश हेझलवुडने आतापर्यंत 5 टी-20 (T20) स्पर्धांच्या अंतिम सामन्यांमध्ये भाग घेतला असून, या सर्व फायनल्समध्ये त्याचा संघ अजिंक्य राहिला आहे.या 5 अंतिम सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) साठी खेळलेल्या प्रत्येकी एका आयपीएल (IPL) फायनलचा समावेश आहे. या 5 अंतिम सामन्यांमध्ये त्याने 13.9 च्या सरासरीने आणि ७.१ च्या इकॉनॉमी रेटने एकूण 10 बळी (wickets) घेतले आहेत. विशेष म्हणजे, टी-20 फायनलमध्ये बळी न मिळवण्याची वेळ त्याच्यावर कधीही आलेली नाही, तो प्रत्येक फायनलमध्ये विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला आहे.
जोश हेझलवुडची सर्वोत्कृष्ट कामगिरी
2021च्या टी 20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध त्याने 16 धावा देऊन 3 बळी मिळवले होते, जी त्याची फायनलमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. या मोसमात त्याची कामगिरी थोडी अस्थिर असली तरी, त्याने 12 सामन्यांत 35.15 च्या सरासरीने आणि 13 बळी घेतले आहेत. या हंगामात 12 धावांत 4 बळी ही त्याची एका सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Author : जयदीप मेढे</

