Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
June 2026 Monthly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी जूनचा महिना कसा असणार? कोणत्या 3 राशींना लागणार लॉटरी, वाचा मासिक राशीभविष्य

June 2026 Monthly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी जूनचा महिना कसा असणार? कोणत्या 3 राशींना लागणार लॉटरी, वाचा मासिक राशीभविष्य

ABP माझा 4 months ago

June 2026 Monthly Horoscope : ज्योतिष शास्त्रानुसार, मेचा (May 2026)महिना संपून लवकरच आता जून (June 2026)महिन्याला सुरुवात होणार आहे. हा महिना ग्रह-नक्षत्रांच्या तुलनेने फार शुभ असणार आहे.

मेचा महिना संपला आता जून महिना नेमका कसा असेल? याबाबत अनेकांना उत्सुकता असते. यासाठीच याठिकाणी आपण मेष ते कन्या राशींचं मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope) जाणून घेणार आहोत.

मेष रास (Aries May 2026 Monthly Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी जूनचा महिना काहीसा व्यस्त असणार आहे. या काळात कामाच्या ठिकाणी तुम्हाला काहीसा दबाव जाणवू शकतो. तसेच, सहकाऱ्यांबरोबर छोट्या मोठ्या कारणांवरुन वादही होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला सावधानता बाळगण्याची गरज आहे. जून महिन्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. आर्थिक बाबतीत तुम्ही गोष्टी संयमाने हाताळाल.

वृषभ रास (Taurus May 2026 Monthly Horoscope)

वृषभ राशीसाठी जूनचा महिना सौभाग्याचा असणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत भरभराट पाहायला मिळेल. मात्र, पैशांचा फार जपून वापर करा. विनाकारण पैसे खर्च करु नका. तुमच्या उत्पन्नावर अनेकजण अवलंबून असतील. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल. तसेच, समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मानही मिळेल.

मिथुन रास (Gemini May 2026 Monthly Horoscope)

मिथुन राशीसाठी जूनचा महिना काहीसा चढ-उतारांचा असणार आहे. या काळात तुम्हाला कौटुंबिक जीवनात, नात्यांच्या बाबतीत सतर्क राहण्याची गरज आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी देखील तुमचा टार्गेट पूर्ण करण्यासाठी अनेक अडथळे येऊ शकतात. अचानक मोठे खर्च उद्भवू शकतात. मानसिक तणावाचाही सामना करावा लागू शकतो.

कर्क रास (Cancer May 2026 Monthly Horoscope)

कर्क राशीसाठी जूनचा महिना शुभवार्ता घेऊन येणारा असणार आहे. या काळात तुमचं मन प्रसन्न राहील. कुटुंबियांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. परदेशात जाण्याची देखील संधी निर्माण होईल. तुमच्या कामाच्या बाबतीत तुम्ही प्रामाणिक असाल. अनेक नवीन गोष्टी तुम्हाला शिकता येतील. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार अधिक वाढलेला दिसेल.

सिंह रास (Leo May 2026 Monthly Horoscope)

सिंह राशीसाठी जूनचा महिना सतर्कतेचा असणार आहे. या कालावधीत तुम्हाला जर एखाद्या नवीन वस्तूची खरेदी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काही काळ प्रतिक्षा करावी लागेल. वाहन चालवताना काळजी घ्या. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कामामुळे तुम्हाला समाधान मिळू शकतं. आरोग्याच्या बाबतीत चिंता करण्याची गरज नाही.

कन्या रास (Virgo May 2026 Monthly Horoscope)

कन्या राशीसाठी जूनचा महिना भाग्यशाली असणार आहे. या कालावधीत तुम्ही हाती घेतलेल्या कार्याला चांगलं यश मिळेल. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेले तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील. भौतिक सुख-समृद्धीचा तुम्ही लाभ घ्याल. आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. समाजातील काही दिग्गज लोकांशी तुमच्या या महिन्यात भेटीगाठी होतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Shubh Yog 28 May 2026 : आज त्रिपुष्कर योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; वृषभसह 5 राशींचं भाग्य उजळणार, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता

Author : एबीपी माझा वेब टीम

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha