Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
June 2026 Monthly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी जून महिना नशीब पालटणारा! 6 पैकी 4 राशींची श्रीमंतीकडे वाटचाल, पैसा, नोकरी, प्रेम.. मासिक राशीभविष्य वाचा

June 2026 Monthly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी जून महिना नशीब पालटणारा! 6 पैकी 4 राशींची श्रीमंतीकडे वाटचाल, पैसा, नोकरी, प्रेम.. मासिक राशीभविष्य वाचा

ABP माझा 4 months ago

June 2026 Monthly Horoscope : ज्योतिषशास्त्रानुसार, मे (May 2026) महिना अवघ्या काही दिवसांतच संपणार आहे, अशात आता जून (June 2026) महिन्याला सुरुवात होणार आहे. हा महिना कसा जाणार?

याबाबत अनेकांना उत्सुकता आहे, ज्योतिषशास्त्रानुसार, जून महिना हा ग्रह-नक्षत्रांच्या तुलनेने फार शुभ असणार आहे. आर्थिक, करिअर आणि वैवाहिक जीवनाबाबत जून महिना नेमका कसा असेल? यासाठी तूळ ते मीन अशा 6 राशींचं मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope) जाणून घेणार आहोत.

तूळ रास (Libra June 2026 Monthly Horoscope)

तूळ राशींसाठी जून महिना तुमच्यासाठी सकारात्मक बदल घेऊन येईल. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. व्यवसायात नवीन भागीदारी फायदेशीर ठरू शकते. प्रेम जीवनात गोडवा वाढेल. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा महत्त्वाचा राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक रास (Scorpio June 2026 Monthly Horoscope)

या महिन्यात आत्मविश्वास वाढलेला दिसेल. कामाच्या ठिकाणी तुमचे निर्णय प्रभावी ठरतील. आर्थिकदृष्ट्या लाभाचे संकेत आहेत. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. प्रेम जीवनात भावनिक जवळीक वाढेल. आरोग्य चांगले राहील, पण तणाव टाळणे गरजेचे आहे.

धनु रास (Saggitarius June 2026 Monthly Horoscope)

धनु राशींसाठी जून महिना भाग्यशाली राहण्याची शक्यता आहे. परदेशाशी संबंधित कामात यश मिळू शकते. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण राहील.

मकर रास (Capricorn June 2026 Monthly Horoscope)

या महिन्यात संयम आणि नियोजन महत्त्वाचे ठरेल. कामात काही अडथळे आले तरी प्रयत्न सुरू ठेवा. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास टिकवणे गरजेचे आहे.

कुंभ रास (Aquarius June 2026 Monthly Horoscope)

कुंभ राशींसाठी जून महिना नवीन संधी घेऊन येईल. व्यवसायात विस्ताराचे योग आहेत. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. मित्रांच्या मदतीने महत्त्वाचे काम पूर्ण होईल. प्रेम जीवनात सकारात्मक बदल दिसतील.

मीन रास (Pisces June 2026 Monthly Horoscope)

मीन राशीसाठी जून महिना लाभदायक राहील. करिअरमध्ये प्रगती होईल आणि मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. आरोग्याच्या बाबतीत नियमित दिनचर्या पाळणे फायदेशीर ठरेल.

हेही वाचा

Weekly Horoscope: जून महिन्याचा पहिलाच आठवडा पॉवरफुल, 7 राशींचं नशीब पालटणार! ग्रहांचे अद्भूत राजयोग, दत्तगुरूंचं पाठबळ, 12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीप माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Author : एबीपी माझा वेब टीम

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha