नवी दिल्ली : महसुलाच्या (Revenue) बाबतीत देशात कोणतं राज्य आघाडीवर आहे याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? तर महसुलाच्या बाबतीत दिल्ली देशात पहिल्या क्रमांकावर आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये, दिल्लीने आपल्या एकूण महसुलापैकी 91.6 टक्के महसूल स्वतःच्या स्रोतांमधून मिळवला.
दिल्ली केंद्रीय निधीवर कमी अवलंबून कशी आहे. दरम्यान, दिल्ली जरी महसूलाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असली तरी महाराष्ट्राची, गुजरातची नेमकी काय स्थिती आहे? याबाबतची देखील माहिती पाहुयात.
दरम्यान, दिल्ली हे केवळ राजकारण आणि व्यवसायाचे केंद्र नाही, तर आर्थिकदृष्ट्याही एक मजबूत राज्य आहे. 2024-25 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार, दिल्ली स्वतःच्या स्रोतांमधून सर्वाधिक कर गोळा करण्याच्या बाबतीत देशात आघाडीवर आहे. दिल्लीच्या एकूण करांमध्ये स्वतःच्या स्रोतांमधून मिळणाऱ्या करांचा वाटा अंदाजे 91.6 टक्के आहे. दिल्ली सरकारच्या उत्पन्नाचा एक मोठा भाग राज्याच्या स्वतःच्या करांमधून आणि करेतर महसुलातून येतो. इतर राज्यांच्या तुलनेत, दिल्लीला आपल्या खर्चासाठी आणि विकास योजनांसाठी केंद्रीय निधीवर कमी अवलंबून राहावे लागते.
मोठी बाजारपेठ, व्यवसाय, स्थावर मालमत्ता आणि उत्पन्नाचे इतर स्रोतांमुळं आर्थिक स्थिती मजबूत
2025 च्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार दिल्लीच्या एकूण करांमध्ये स्व-स्रोत करांचा वाटा 91.6 टक्के आहे. हा वाटा देशातील सर्व राज्यांमध्ये सर्वाधिक असून, दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. स्व-स्रोत करांमध्ये विशेषतः सरकारने स्वतः गोळा केलेल्या करांचा आणि करेतर महसुलाचा समावेश होतो. याचा अर्थ असा की, राज्याला आपल्या उत्पन्नासाठी इतर स्रोतांमधून मिळणाऱ्या निधीवर जास्त अवलंबून राहण्याची गरज नाही. मोठी बाजारपेठ, व्यवसाय, स्थावर मालमत्ता आणि उत्पन्नाचे इतर स्रोत यांमुळे दिल्लीची करविषयक स्थिती मजबूत आहे.
गुजरात आणि महाराष्ट्राची काय परिस्थिती?
दिल्लीनंतर, काही मोठी आणि औद्योगिक राज्ये देखील त्यांच्या स्वतःच्या स्रोतांमधून कर संकलनाच्या बाबतीत मजबूत स्थितीत आहेत. आर्थिक वर्ष 2025 च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार, गुजरातच्या स्वतःच्या स्रोतांमधून एकूण कर महसुलात अंदाजे 85.5 टक्के योगदान आहे, तर महाराष्ट्राचा वाटा अंदाजे 85 टक्के आहे. त्यानंतर हरियाणा आणि कर्नाटकचा क्रमांक लागतो.
दिल्लीला महसूल कसा मिळतो?
दिल्ली हे देशातील सर्वात मोठ्या शहरी आणि बाजारपेठ क्षेत्रांपैकी एक आहे. येथे मोठ्या संख्येने व्यावसायिक आस्थापने, सेवा क्षेत्रातील कंपन्या, किरकोळ व्यवसाय आणि आर्थिक उत्पन्नाचे इतर स्रोत आहेत. शिवाय, दिल्लीचा कर संकलनाचा पाया देखील मोठा आहे. व्हॅट/जीएसटी कर, मुद्रांक आणि नोंदणी, उत्पादन शुल्क आणि मोटार वाहन कर यांसारखे स्रोत सरकारच्या स्वतःच्या करांमध्ये योगदान देतात. सेवा क्षेत्र दिल्लीच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देते.
राज्यांचा एकूण महसूल समजून घेण्यासाठी, स्व-स्रोत कर आणि केंद्रीय हस्तांतरण यांमधील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. स्व-स्रोत कर म्हणजे राज्य सरकार स्वतःच्या कर आणि गैर-कर स्रोतांमधून गोळा करत असलेला पैसा. याव्यतिरिक्त, यामध्ये केंद्रीय करांमधील राज्याचा वाटा आणि केंद्राकडून मिळणारे हस्तांतरण यांचा समावेश असतो. ज्या राज्यांच्या एकूण कर महसुलात स्व-स्रोत करांचा वाटा जास्त असतो, ती राज्ये सामान्यतः बाह्य मदतीवर कमी अवलंबून असतात.
Author : गणेश लटके

