Kamal Haasan Meets Tamil Nadu CM Thalapathy Vijay: साऊथ इंडस्ट्रीसह (South Indian Film Industry) बॉलिवूड (Bollywood News) गाजवणारा सुपरस्टार म्हणजे, ज्येष्ठ अभिनेते कमल हसन (Veteran Actor Kamal Haasan).
खरं तर थलपती विजय (Thalapathy Vijay) अभिनय सोडून थेट तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी (Tamil Nadu CM Thalapathy Vijay) विराजमान झाल्यापासूनच कमल हसन (Kamal Haasan) चर्चेत आहेत. सर्वात आधी सुपरस्टार कमल हसन यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकांमधील मोठ्या विजयासाठी थलपतीचं अभिनंदन करत, त्यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली. त्यानंतर मुख्यमंत्री होताच थलपती विजय यांनी दारूबाबत घेतलेल्या निर्णयाचं कमल हसन यांनी भरभरुन कौतुक केलं. आणि आता थेट सहा मागण्या घेऊन मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या भेटीसाठी पोहोचले.
ज्येष्ठ भारतीय अभिनेते कमल हसन यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांची भेट घेतली. त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर सहा मागण्याही सादर केल्या आहेत. कमल हसन यांनी मुख्यमंत्री विजय यांच्यासोबतच्या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सिनेसृष्टीच्या वतीनं कमल हसन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नेमक्या काय मागण्या केल्यात? सविस्त जाणून घेऊयात...

कमल हासन आणि मुख्यमंत्री थलपती विजय यांची भेट (Kamal Haasan Meets Tamil Nadu CM)
अभिनय सोडून राजकारणी बनलेले थलपती विजय यांनी 10 मे रोजी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून पदाची शपथ घेतली. राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर, कमल हासन यांनी थलपती विजय आणि त्यांच्या टीव्हीके पक्षाचं भरभरुन कौतुक केलं. अशातच आता सहा मागण्या घेऊन थेट मुख्यमंत्री थलपती विजय यांची भेट घेतली. सर्वात आधी त्यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं. या भेटीदरम्यान, त्यांनी तामिळ सिनेसृष्टीशी संबंधित सहा मागण्या सादर केल्या आणि सध्या सिनेसृष्टीला भेडसावणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी राज्य सरकारच्या पाठिंब्याची नितांत गरज असल्याचं अधोरेखित केलं.
मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो शेअर करताना कमल हासन यांनी लिहिलंय की, "आज, मी तामिळनाडूचे माननीय मुख्यमंत्री भाई विजय यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांना माझ्या शुभेच्छा दिल्या... त्यांनी तामिळनाडूच्या विकासासाठी पाहिलेली आपली अनेक स्वप्नं मोठ्या उत्साहानं माझ्याशी शेअर केली. आमच्या भेटीदरम्यान त्यांनी दाखवलेली नम्रता आणि आपुलकी पाहून मला अभिमान वाटला. मी त्यांच्याकडे सहा मागण्या सादर केल्या. तसेच, तामिळ चित्रपटसृष्टी सध्या अनेक आव्हानांशी झुंज देत असल्याचंही मी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. या चित्रपटसृष्टीला तामिळनाडू सरकारच्या सहकार्याची आणि पाठिंब्याची अत्यंत गरज आहे. ईश्वर करो... नेहमीच चांगल्याचा विजय होवो..."
आपल्या आवडत्या कलाकारांना एकत्र पाहून चाहत्यांची मनं आनंदानं भरून गेली आहेत. या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. कमल हासन आणि विजय यांना खांद्याला खांदा लावून उभं असलेलं पाहून एका चाहत्यानं लिहिलंय की, "भारतीय सिनेसृष्टीतील दोन GOAT, एकत्र..." दुसऱ्या एका युजरनं कमेंट केलीय की, "एखाद्या मार्गदर्शकाला आपल्या शिष्याच्या यशाचा नेहमीच अभिमान वाटतो. धन्यवाद, सर... तुम्ही एक अत्यंत उत्तम माणूस आहात..."
दरम्यान, थलपती विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सुपरस्टार कमल हसन यांनी त्यांचं कौतुक करत अभिनंदन केलेलं. अभिनंदन करताना त्यांनी लिहिलेलं की, "तामिळ विजय लीगचे अध्यक्ष, तामिळनाडूचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि माझे बंधू, श्री विजय (@TVKVijayHQ) यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडूची उज्ज्वल वाटचाल होवो. राज्यानं यशाची नवी शिखरं गाठावीत. मी मनःपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो."
Author : एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क

