Kangana Ranaut on Kriti Sanon GIVA Ad: रक्षा बंधनाच्या (Raksha Bandhan) एका जाहिरातीमध्ये असा वाद निर्माण झाला की, त्याचे पडसाद बॉलिवूडपासून ते राजकारणापर्यंत उमटले आहेत. लोकसभा खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने 'Giva' या ज्वेलरी ब्रँडच्या जाहिरातीमधील क्रिती सेननच्या लूकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहेत.
कंगना रनौतने क्रिती सेननवर (Kriti Sanon) टीकाही केली. दरम्यान, कंगनाच्या पोस्टनंतर क्रितीने आपल्या पोशाखाचे समर्थन करत म्हटलं की, संस्कृती आणि परंपरा हृदयाशी जोडलेल्या आहेत. कपड्यांवर नाही, असं तिने पोस्टमध्ये म्हटलं. वाद वाढत गेल्यानंतर GIVAने ती जाहिरातही काढून टाकली. दरम्यान, या सर्व गदारोळानंतर अभिनेत्री कंगनाने अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत कृतीच्या कपड्यांपेक्षा जाहिरातीत दुसरीच गोष्ट खटकली असल्याचं सांगितलं.
क्रितीच्या जाहिरातीवरुन कंगना काय म्हणाली? (Kangana Ranaut says Kriti Sanons clothes were not the Issue)
कृतीचे कपडे नाही तर, मग कोणती गोष्ट कंगना रनौतला खटकली. डीडी व्यूज शोमध्ये सुधीर चौधरीसोबत बोलताना कंगना रनौत म्हणाली की, 'कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या आवडीचे कपडे घालण्यापासून रोखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जाहिरातींमध्ये एका पारंपारिक सणाचे चित्रण कसे केले जाते? हा खरा मुद्दा आहे'. कंगना म्हणली, 'हिंदू नातेसंबंधांमध्ये अधिक प्रतिष्ठा आणि मर्यादा आहेत'. यावेळी तिने जाहिरातीत कृतीने घातलेलं ब्रालेट ही मोठी समस्या नव्हती, असं सांगितलं.
कंगनाने क्रिती सेननच्या कपड्यांवर भाष्य करत म्हणाली की, 'तिला काहीही घालण्यापासून कोण रोखत आहे? तिला कधी कुणी थांबवलं आहे का? ती काय घालते याची कुणाला पर्वा आहे का? मला असं वाटतं की, तिची ब्रालेट ही एक खूप छोटी गोष्ट होती. सर्वात मोठा मुद्दा हा आहे की, ज्या परंपरेतून आपण आलो आहोत, तिथे आपले आई - वडील कुठे आहेत? श्रीखंड - पुरी, टिळा, उदबत्त्या, दिवे.. असं काहीच का नाही? तुम्ही म्हणता की एस्थेटिक्सला जास्त महत्त्व नाही. पण टिळा आणि विधींशिवाय रक्षाबंधन साजरे होऊ शकत नाही', असं कंगना म्हणाली.
कंगनाने यावेळी प्रश्न उपस्थित केला. अभिनेत्री म्हणाली की, जेव्हा सनातन परंपरा जपून ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर, त्याच प्रकारे तुम्ही सांस्कृतिक मुल्यांकडे का दुर्लक्ष करत आहात? तिने यावर भर देत म्हटलं की, टिळाशिवाय रक्षा बंधन हा सण पूर्ण होऊ शकत नाही. सण - उत्सव हे केवळ धार्मिक विधी नसून, ती संस्कृती आणि सभ्यतेची सुंदर प्रतिक आहे, असंही कंगना म्हणाली.
वाद कसा निर्माण झाला?
ज्वेलरी ब्रँड 'GIVA' च्या रक्षाबंधन जाहिरातीत क्रिती सेननने इंडो वेस्टर्न ब्रालेट स्टाइल ब्लाऊज आणि लेहेंगा घातला होता. या जाहिरातीत क्रिती तिच्या भावाला तसेच पाळीव श्वानालाही राखी बांधताना दिसली. या जाहिरातीनंतर कंगना रनौतची पहिली प्रतिक्रिया समोर आली. या जाहिरातीला कंगनाने 'इंटेंशनली क्रिपी', असं म्हटलं. कंगनाच्या टीकेवर क्रिती सेनननेही प्रतिक्रिया दिली. 'संस्कृती आणि परंपरा हृदयात वसलेल्या असतात. नेकलाइनमध्ये नाही', असं तिने म्हटलं होतं.
इतर बातम्या:
Author : भाग्यश्री कांबळे

