Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कार्यकर्ते टिकवण्यासाठी आणि पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत, खासदार नरेश म्हस्केंचा हल्लाबोल

कार्यकर्ते टिकवण्यासाठी आणि पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत, खासदार नरेश म्हस्केंचा हल्लाबोल

ABP माझा 2 weeks ago

Naresh Mhaske on Uddhav Thackeray : गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीसंबंधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

सर्वोच्च न्यायालय शिवसेना पक्षचिन्ह आपल्यालाच देणार, आणि जरी चिन्ह आपल्याला मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी केला. यावर शिवसेना शिंदे गटाचे खासदर नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंना रोज आमदार माजी खासदार पदाधिकारी सोडून जातायेत. ते शिंदे साहेबांचे नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करत आहेत. तर काही लोकं भारतीय जनता पार्टीमध्ये देखील प्रवेश करत आहेत असे म्हस्के म्हणाले. कार्यकर्ते टिकावेत, कार्यकर्त्यांना आधार द्यावा म्हणून ते सारखे वक्तव्य करत आहेत असे म्हस्के म्हणाले.

त्यावेळी मी माझे कुटुंब आणि ऑलाईनमध्ये गाडी अडकली

उद्धव ठाकरेंना व्याकुलतेने लोकांना विनंती करावी लागत आहे. जे म्हणत होते लोकांना की ज्यांना जायचंय त्यांनी जा, मला काहीही फरक पडत नाही असं त्यांना खोटं बोलावं लागत आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी काय सांगितलं आहे का? निर्णय काय लागणार आहे. केवळ पक्ष वाचवण्याकरिता उद्धव ठाकरेंची अशाप्रकारे कृती होते. वेळ गेलेली आहे. यावेळी पक्षाकरता त्यांनी बाहेर पडायला पाहिजे होतं. त्यावेळी मी आणि माझे कुटुंब आणि मी ऑनलाइन यामध्ये त्यांची गाडी अडकून राहिली होती असे म्हस्के म्हणाले.

अभिजीत दिपके यांच्या आंदोलनामध्ये जातात काय, त्यांना भेटतात काय, त्यांच्या नावाने मुंबईमध्ये गर्दी जमवायचे प्रयत्न करतायेत. नक्की तुम्ही काय करत आहेत. तुमच्यासोबत कोण आहेत. याचा विचार करणे गरजेचे आहे असा सवाल म्हस्केंनी ठाकरेंना केला.

शिवसेना पक्षचिन्ह आपल्यालाच देणार, मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल : उद्धव ठाकरे

गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीसंबंधी उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालय शिवसेना पक्षचिन्ह आपल्यालाच देणार, आणि जरी चिन्ह आपल्याला मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच सध्याचा काळ हा पक्षवाढीसाठी अनुकूल असून 2029 च्या निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांची बैठक शिवसेना भवनात पार पडली. यावेळी पक्षाच्या पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पक्ष आणि चिन्हाच्या लढाईत आपलाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केल्याची माहिती आहे.

2029 च्या निवडणुकीच्या तयारीला लागा

आपल्याला चिन्ह मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना कानपिचक्याही दिल्या. जबाबदारी पार पाडता येत नसेल तर पद सोडावे, अशा पदाधिकाऱ्यांना अन्य जबाबदारी दिली जाईल, असं उद्धव ठाकरे म्हणाल्याची माहिती आहे.

Author : अक्षय भाटकर, एबीपी माझा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha