डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेत (KDMC) कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्यावर महिला कर्मचाऱ्याकडून शरीरसुखाची (KDMC Crime News) मागणी केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित लिपिक भूषण पाटील याला निलंबित करण्यात आले असून, घटनेमुळे पालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे.(kdmc officer)
मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात एका कामाच्या कारणावरून भूषण पाटील आणि पीडित महिला कर्मचारी यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी रात्री पाटील याने पीडितेला फोन करून 'तुला कामावरून काढण्याचे आदेश आले आहेत. ही कारवाई थांबवायची असेल तर मला काय देशील?' असे म्हणत शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.(KDMC Crime News)
पीडित महिलेने यापूर्वीही संबंधित अधिकाऱ्याविरोधात केडीएमसी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर तिने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भूषण पाटीलविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी काही महिला कर्मचाऱ्यांनीही पाटीलविरोधात तक्रारी केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले असून, तपासादरम्यान आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(KDMC Crime News)
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी याबाबत केडीएमसी प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी तात्काळ कारवाई करत भूषण पाटील याला निलंबित करण्याचे आदेश दिले. तपासावर कोणताही परिणाम होऊ नये, पुरावे नष्ट होऊ नयेत आणि साक्षीदारांवर दबाव येऊ नये, यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहेत.(KDMC Crime News)
KDMC: नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात एका कामावरून भूषण पाटील आणि पीडित महिला कर्मचारी यांच्यात वाद झाला होता. यावेळी पाटील याने सर्वासमक्ष तिला शिवीगाळ केली होती. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी रात्री पीडित महिला घरी असताना पाटील याने तिला फोन केला. "तुझ्या कामावरून काढण्याची ऑर्डर आली आहे, ती रद्द करायची असेल तर त्या बदल्यात मला काय देशील?" असे विचारत त्याने शरीरसुखाची मागणी केली असल्याचं आरोप पीडित महिलेने तक्रारीत केला आहे.या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आयुक्त अभिनव गोयल यांनी पाटील याला निलंबित करण्याचे आदेश दिले. "पाटील विरोधात दाखल गुन्ह्याची चौकशी व्हावी, कोणताही पुरावा नष्ट होऊ नये आणि साक्षीदारांवर दबाव येऊ नये, यासाठी त्याला सेवेत ठेवणे हितावह नाही," असे आयुक्तांनी निलंबन पत्रात नमूद केले.
इतर महत्वाच्या बातम्या
- पालघरच्या बोईसरमध्ये भीषण अपघात, दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानं दोन जणांचा जागीच मृत्यू
- Nashik Accident News : हृदयद्रावक! नाशिकच्या दिंडोरीमध्ये भीषण अपघात, भरधाव कार विहिरीत कोसळली, 9 जणांचा जागीच अंत
- Solapur Car Accident: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! एक डुलकी लागली अन् कार थेट पुलावरून कालव्यात कोसळली; आई-वडिलांसह विवाहित लेकीचा बुडून मृत्यू, जावई गंभीर
Author : सुरेश काटे

