Dailyhunt
Kerla Election Result 2026: केरळमध्ये काँग्रेसने भाजपचे मनसुबे उधळले, दणदणीत यश, कोणाला किती जागा?

Kerla Election Result 2026: केरळमध्ये काँग्रेसने भाजपचे मनसुबे उधळले, दणदणीत यश, कोणाला किती जागा?

ABP माझा 1 week ago

Kerla Election Result 2026: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आसाम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला.

सकाळी आठ वाजता या पाचही राज्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. या निकालांमध्ये भाजपने मोठी मुसंडी मारल्याचे दिसून आले. सध्याच्या कलानुसार पश्चिम बंगाल (West Bengal Election 2026) आणि आसाममध्ये भाजपला (BJP) मोठे यश मिळताना दिसत आहे. मात्र, काँग्रेस आणि डाव्यांचा गड असलेल्या केरळमध्ये भाजपला फारसे यश मिळताना दिसत नाही. केरळ विधानसभेच्या (Kerla Assembly Election Result 2026) एकूण 140 जागांचे प्राथमिक कल हाती आले आहेत. यामध्ये काँग्रेसप्रणित युडीएफ आघाडी 83, डावी आघाडी 53 आणि भाजपचे अवघे 4 उमेदवार आघाडीवर आहेत. केरळमध्ये बहुमतासाठी 70 ही मॅजिक फिगर आहे. सध्याच्या कलानुसार, काँग्रेसचे 72 उमेदवार आघाडीवर आहेत. (Assembly Election Results 2026)

सध्याची परिस्थिती पाहता केरळमध्ये काँग्रेसप्रणित युडीएफ आघाडीचे सरकार येण्याची दाट शक्यता दिसत आहे. त्यामुळे केरळमधील काँग्रेस पक्षसंघटनेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. केरळमधील काँग्रेस मुख्यालयात सध्या कार्यकर्त्यांची गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. हे कार्यकर्ते टीव्ही स्क्रीनवरील निकाल पाहून टाळ्या वाजवून जल्लोष करताना दिसत आहेत. यापूर्वी केरळमध्ये डाव्यांचे सरकार होते. भाजपने यंदाच्या निवडणुकीत केरळमध्ये बरीच ताकद लावली होती. मात्र, या निवडणुकीत सध्या काँग्रेस बाजी मारताना दिसत आहे.

Author : रोहित धामणस्कर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha