Dailyhunt
Keshav Upadhye: विधान परिषद निवडणुकीसाठी पक्षानं डावललं, टीकाकारांना केशव उपाध्येंनी चांगलंच सुनावलं, अटलजींच्या कवितेचा दाखला देत म्हणाले....

Keshav Upadhye: विधान परिषद निवडणुकीसाठी पक्षानं डावललं, टीकाकारांना केशव उपाध्येंनी चांगलंच सुनावलं, अटलजींच्या कवितेचा दाखला देत म्हणाले....

ABP माझा 1 week ago

Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषद निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Parishad Election 2026) आज (30 एप्रिल) उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा शेवटचा दिवस आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडत असल्याचे चित्र आहे . तर भाजपकडून आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी मंगळवारी पाच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.

यामध्ये सुनिल कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांचा समावेश आहे. भाजप यंदा विधान परिषद निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देणार, अशी चर्चा सुरुवातीपासून होती. त्यासाठी भाजपने आधी 30 आणि नंतर 14 नावांची यादी दिल्लीला पाठवली होती. त्यापैकी पाच जणांच्या नावावर दिल्लीतील भाजप नेतृत्त्वाने संमतीची मोहोर उमटवली. मात्रयासगळ्यातएकनावाचीचर्चाहोती, तेम्हणजेभाजपचेनेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye). मात्रत्यातत्यांचेनावनआल्यानेआताटीकाकारांनी केशव उपाध्येंनीलक्षकरतट्रॉलकरायलासुरुवातकेलीआहे. यावरउपाध्येंनी अटलजींच्याकवितेचादाखलादेतयाटीकाकारांनीचांगलंचसुनावलंआहे.

Keshav Upadhye : नेमकंकायम्हणाले केशव उपाध्ये?

की घेतले न हे व्रत अंधतेने…'

२५-३० वर्षांपूर्वी विचारधारेचे काम सुरू करताना कुठे, काय, कोण, कधी होणार याचा कधीही विचार केला नव्हता. प्रखर राष्ट्रवादाची भावना आणि सकारात्मक काम करण्याची जिद्द, यातूनच या प्रवासाला सुरुवात झाली… आणि पाहता पाहता २५-३० वर्षे कधी निघून गेली ते कळलेच नाही.

ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करत राहिलो… अनेक प्रसंग आले आणि मग अशा वेळी अटल बिहारी वाजपेयी नेहमी ज्यांची कविता सांगायचे त्या शिवमंगल सिंह सुमन यांच्या ओळी कायम प्रेरणा देत राहिल्या…

'संघर्ष पथ पर जो मिले, यह भी सही… वह भी सही…'

हीच एका खऱ्या कार्यकर्त्याची भूमिका असते… आणि तीच भूमिका आजही कायम आहे.

परवा सायंकाळी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर झाले. हे सर्व सहकारीच आहेत. त्यामुळे मनापासून आनंद झाला. सुनील कर्जतकर, माधवी नाईक, प्रमोद जठार तसेच संजय भेन्डे आणि विवेक कोल्हे यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

बाकी… मला ट्रोल करण्यात, 'सतरंजी उचले' म्हणण्यात ज्यांना आनंद मिळतो, तो त्यांनी जरूर घ्यावा. त्यांनाही मनापासून शुभेच्छा!

विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)

  • निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026
  • उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026
  • उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026
  • मतदानाची तारीख: 12 मे 2026
  • मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.
  • मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता
  • निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026

इतर महत्वाच्या बातम्या

Author : विशाल देवकर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha