Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Ketu Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या 24 तासांत केतूचं नक्षत्र परिवर्तन! 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ, हातात खेळणार पैसाच पैसा

Ketu Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या 24 तासांत केतूचं नक्षत्र परिवर्तन! 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ, हातात खेळणार पैसाच पैसा

ABP माझा 4 months ago

Ketu Nakshatra Parivartan 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, केतू (Ketu Gochar) ग्रहाला एक रहस्यकारी आणि परिणामकारक ग्रह मानतात. हा ग्रह अचानक अचानक होणाऱ्या घटनांशी संबंधित आहे. तसेच, या काळात केतू मघा नक्षत्रात स्थित आहे आणि 29 मे 2026 रोजी म्हणजेच उद्या मघा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात प्रवेश करणार आहे.

ही स्थिती 1 ऑगस्ट 2026 पर्यंत असणार आहे. केतू ग्रहाचं हे नक्षत्र परिवर्तन अनेक राशींच्या जीवनात बदल घडवून आणणारं आहे.

खरंतर, केतूला पापी ग्रह मानतात. पण, केतू नेहमीच नकारात्मक परिणाम देत नाही. अनेकदा केतू ग्रहाच्या प्रभावाने आपल्या जीवनात सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. या काळात काही राशींच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झालेली दिसेल. केतूच्या संक्रमणाने कोणकोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात.

मेष रास (Aries Horoscope)

या काळात मेष राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे दार उघडतील. विशेषत: तुमच्या व्यवसायाचा विस्तार अधिक वाढलेला दिसेल. तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी अनेक नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. तुमच्या खर्चात अचानक वाढ होऊ शकते. यासाठी बजेटवर लक्ष द्या.

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी हा काळ विश्रांतीचा असणार आहे. या काळात तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा आलेली दिसेल. तसेच, जुन्या समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळेल. कामाच्या ठिकाणी चांगले बदल पाहायला मिळतील. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. धनलाभाचे संकेत आहेत.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण भाग्यशाली असणार आहे. या काळात नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. तसेच, संपत्ती किंवा वाहनाची खरेदी तुम्ही या काळात करु शकता. घराच्या संबंधित तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळू शकते.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांना या काळात आर्थिक लाभ मिळू शकते. तसेच, जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला आर्थिक लाभ मिळेल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना लवकरच प्रमोशनची संधी मिळू शकते.

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी हा काळ स्थिरतेचा असणार आहे. तुमच्या कामात येणारे अडथळे हळुहळू दूर होतील. नोकरीत तुमच्यावर काही नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येऊ शकतात. तसेच, तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील. लवकरच धार्मिक यात्रेला जाण्याचे योग जुळून येणार आहेत.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

June 2026 Monthly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी जूनचा महिना कसा असणार? कोणत्या 3 राशींना लागणार लॉटरी, वाचा मासिक राशीभविष्य

Author : एबीपी माझा वेब टीम

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha