Khappar Yog 2026 : मे (May 2026) महिन्याची सुरुवात अवघ्या काही तासांनी होणार आहे. ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने या वेळी एक विशेष संयोग जुळून येणार आहे. ज्याला 'खप्पर योग' (Khappar Yog) म्हणतात.
मान्यतेनुसार, हा योग काही राशींसाठी फार आव्हानात्मक ठरणार आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार, याचा थेट परिणाम करिअर, आर्थिक स्थिती आणि वैयक्तिक जीवनावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात काही राशींनी सतर्क राहण्याची गरज आहे.
खप्पर योग म्हणजे काय?
ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा ग्रहांची एक विशेष स्थिती निर्माण होते. त्याला खप्पर योग म्हणतात. हा अशुभ योग मानला जातो. याचा परिणाम चार राशींवर होणार आहे. तेसुद्धा मे ते जून या कालावधीत होणार आहे. त्यामुळे या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या वैवाहिक जीवनावर तसेच, कौटुंबिक जीवनावर याचा परिणाम दिसून येणार आहे. त्यामुळे तुमचा मानसिक ताण वाढेल. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैशांचा जपून वापर करा.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत सावधानता बाळगण्याची गरज आहे. तसेच, अनावश्यक खर्च करु नका. यामुळे तुम्हालाच आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायावर याचा परिणाम दिसून येईल. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त ताण जाणवू शकतो. त्यामुळे या कालावधीत कोणतेही निर्णय घेताना नीट विचारपूर्वक घेणं गरजेचं आहे. या काळात कोणतीही जोखमीची कामं हाती घेऊ नका.
उपाय
खप्पर योगाच्या काळात धैर्याने आणि समजुतीने काम करणं सर्वात महत्त्वाचं आहे. या काळात तुमच्या कामात किंवा कार्यात कोणतीच जोखीम हाती घेऊ नका. तसेच, गुंतवणुकीशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या. घरात वादविवाद वाढू शकतात. त्यामुळे वाणीवर आणि रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Author : एबीपी माझा वेब टीम

