Dailyhunt
लग्नाच्या चारच महिन्यांत सूरज चव्हाणच्या घरी पाळणा हलणार? बायकोनं बेबी बंपसह शेअर केला फोटो

लग्नाच्या चारच महिन्यांत सूरज चव्हाणच्या घरी पाळणा हलणार? बायकोनं बेबी बंपसह शेअर केला फोटो

ABP माझा 1 week ago

Suraj Chavan Wife Sanjana Share Good News: 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) सीझन 5 चा विजेता आणि सोशल मीडिया स्टार (Social Media Star) सूरज चव्हाण (Suraj Chavan) आणि त्याची पत्नी संजना चव्हाण (Suraj Chavan Wife Sanjana) आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

सध्या दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याची चाहुल लागली की, काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे. संजनानं तिच्या अधिकृत हँडलवरुन एक फोटो शेअर केलाय. त्यामध्ये तिचा बेबी बंप दिसतोय. त्यामुळे सूरज आणि संजनावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय.

सूरज आणि संजनानं 29 नोव्हेंबर 2025 रोजी आपली लग्नगाठ बांधलेली. अशातच लग्नाच्या चारच महिन्यांत संजना आणि सूरजकडे खरंच गूड न्यूज आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर, अनेकांकडून संजना आणि सूरज यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. अशातच आता संजनाने शेअर केलेल्या एका फोटोमुळे ती प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

संजनानं काय पोस्ट केलीय?

सूरज चव्हाणची बायको संजनानं तिच्या अधिकृत सोशल मिडिया हँडलवर दोन फोटो शेअर केलेत. या फोटोमध्ये संजनाचा बेबी बंप दिसतोय, त्यासोबतच तिनं अलका कुबल स्टारर मराठीतील गाजलेला सिनेमा 'देवकी'तलं गाणंही जोडलं आहे. त्यामुळे आता सूरज चव्हाण लवकरच बाबा होणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. सूरज चव्हाणच्या बायकोचा हा लूक डोहाळे जेवणाचा असल्याचंही काहींचं म्हणणं आहे. तर, काहींना प्रश्न पडलाय की, हा फोटो AI जनरेट तर नाही ना? संजनानं तिच्या फोटोवरचं कमेंट सेक्शन बंद ठेवलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चांना उधाण आलं आहे.

सूरज चव्हाणची बायको संजनानं 17 मार्च रोजी एक कमेंट केलेली. त्यावेळी त्यामध्ये संजनानं थेट काहीच सांगितलेलं नव्हतं. पण, चाहत्यांनी अंदाज बांधत तिचं अभिनंदन करण्यास सुरुवात केलेली. आता पुन्हा एकदा तशाच प्रकारची पोस्ट केल्यानं चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

संजनानं पोस्ट शेअर करताना कमेंट सेक्शन बंद ठेवलंय, तर फोटो शेअर करताना तिनं फक्त रेड हार्ट, ब्ल्यू आय आणि प्रेग्नेंट बाई अशा इमोजीचा वापर केलाय. हा फोटो पाहून काहींना सूरज आणि संजनाच्या आयुष्यात लवकरच छोट्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याचं वाटतंय. अशातच आता चाहते त्यांचा लाडका झापुक झुपूक स्टार सूरज चव्हाणच्या प्रतिक्रियेची वाट पाहतायत. पण, सूरजनं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

यापूर्वीही संजनानं केलेली सूचक पोस्ट

सूरज चव्हाणची बायको संजनाने अलीकडेच गुढीपाडव्याच्या निमित्ताने खास फोटोशूट केलेलं. या फोटोशूट मधील एक फोटो तिने पोस्ट केला आहे. त्यामागे एक ऑडिओ वाजतोय. त्यात, "अजून तू माझ्या पोटात आहेस, पण मी तुझ्या प्रत्येक हालचालीला ओळखते. तू हललास की वाटतं आयुष्य हलकं झालं. आता फक्त तुझी वाट बघते. तुझ्या त्या पहिल्या श्वासासाठी, आणि त्या छोट्याशा हसण्यासाठी. माझं संपूर्ण जग तुझ्यात बसलेलं आहे." असा आवाज लावण्यात आलेला आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी तिला अभिनंदन अशा कमेंट्स केल्या आहेत. लग्नानंतर तीन महिन्यातच सुरज चव्हाण बाबा होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. शिवाय राजश्री मराठीच्या सोशल मीडिया पेजवरूनही या संदर्भात एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे त्यामुळे चर्चांना आणखी दुजोरा मिळाल्याचे दिसतय. मात्र सूरज चव्हाण आणि संजना चव्हाण यांच्याकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. आता ही केवळ अफवा आहे की खरंच सुरज चव्हाणच्या घरी गुड न्यूज आहे, हे त्याने अधिकृत स्पष्ट केल्यानंतरच कळेल.

इतर बातम्या:

'अशा प्रसंगांनी मन खचतं..' कोकण हार्टेड गर्ल पोलीसांत जाणार; नेमकं काय घडलंय? video करत सगळं सांगितलं

Author : जयदीप मेढे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha