Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Laxman Hake On Manoj Jarange :  मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या निर्णयावर हाकेंचा सल्ला; म्हणाले, 'रखरखत्या उन्हात आंदोलन करू नये, त्यांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावी, प्रश्न...'

Laxman Hake On Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या निर्णयावर हाकेंचा सल्ला; म्हणाले, 'रखरखत्या उन्हात आंदोलन करू नये, त्यांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावी, प्रश्न...'

ABP माझा 2 weeks ago

जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी येत्या 30 मे पासून आंतरवाली सराटीत रखरखत्या उन्हात आमरण उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे. आज त्यांनी माध्यमांशी बोलताना उपोषणाला बसणार असल्याचं जाहीर केलं, सरकारला गेल्या 10 महिन्यांपासून वेळ दिला होता, त्या काळात सातारा गॅझेटिअरवर जीआर काढला गेला नाही, असं जरांगे यांनी म्हटलं.

उन्हात आमरण उपोषणाला बसणार असून मेलो तरी चालेल, असं मनोज जरांगे(Manoj Jarange) म्हणाले. मला चर्चा नकोय, आरक्षणाची अंमलबजावणी पाहिजे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. याबाबत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी (Laxman Hake) प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप नेत्यांवर संताप व्यक्त केला आहे.(Laxman Hake On Manoj Jarange)

Laxman Hake On Manoj Jarange : ओबीसींना काय मिळालं, याचं एकदा एनालिसिस

लक्ष्मण हाकेंनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं की, हे बघा मनोज जरांगे यांनी हे आंदोलन रखरखत्या उन्हात करू नये, आणि त्यांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावी, प्रश्न असा आहे जे वारंवार दावा करत आहेत की लेकरा बाळांवर अन्याय झाला, गरिबी आली आणि मराठ्यांचं पाच पिढ्याचं खाल्लं. हे जे काय दावा करतात ते ओबीसींनी काय खाल्लं, ओबीसींना काय मिळालं, याचं एकदा एनालिसिस महाराष्ट्र सरकारने केले पाहिजे. कारण महाराष्ट्राच्या या पुरोगामी टोटल बजेट पैकी अर्धा टक्क्याच्या पुढे ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी कधी महाराष्ट्र शासन बजेट आणि तरतूद करू शकले नाही. मनोज जरांगे यांना अर्धा टक्के बजेटमध्ये अख्खा मराठा समाज आणून अर्धा टक्के बजेट शिफ्ट करून घ्यायचा आहे का? मनोज जरांगे यांची मागणी आहे ती बेकायदा आहे, त्यांची मागणी संविधानाला धरून नाही, त्यांची मागणी मान्य झाल्याने ओबीसीचं झोपडं मात्र पूर्णपणे उध्वस्त होणार आहे, असं हाके म्हणालेत.

Laxman Hake On Manoj Jarange : ओबीसींचं काही नुकसान होत आहे, हे पाहण्यात...

जरांगे पाटील इतके आंदोलन करत आहेत, त्यांच्या इतके सल्लागार आहेत, इतके आमदार, खासदार, मंत्री तिथे पोहोचत आहेत. ओबीसीचे आरक्षण संपवणे, हे महाराष्ट्रात षडयंत्र आहे, हा कुटील डाव आहे, खरं कोणीही बोलायला तयार नाही, वास्तव कोणीही बोलायला तयार नाही, संविधानाची भूमिका मांडायला कोणी तयार नाही, ओबीसींचं काय म्हणणं आहे. त्यामध्ये कोणालाही इंटरेस्ट नाही. ओबीसींचं काही नुकसान होत आहे, हे पाहण्यात कोणालाही रस नाही, कालच्या लोकल बॉडीच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये एका-एका जागेवर 100 कुणबी ओबीसींच्या जागेवर बसले आहेत, ओबीसी च्या हिताचा संरक्षण लोकनियुक्त सरकार म्हणून तुम्ही काही केलं का? असा सवालही हाकेंनी उपस्थित केला आहे.

मनोज जरांगेंची मागणी बेकायदेशीर आहे. हाल्याचं दुध काढण्याचा हा प्रकार आहे. पण सरकार मात्र राजकारण करण्यात व्यक्त आहे, कोण त्याला भेटायला जातंय ओ, जो हॉटेल व्यवसायिक त्याला याचं काय ज्ञान आहे ओ, असंही पुढे लक्ष्मण हाकेंनी म्हटलं आहे. विखे पाटील मनोज जरांगेंना भेटणार आहेत त्यावर बोलताना हाके म्हणाले, कारखानदार तिथे जाऊन काय बोलणार आहेत, ते कारखानदार आहेत. पण माझा त्यांना एक सवाल आहे. तुम्ही मागणी करा जावा, तुम्ही रेड कार्पेट घाला पण ओबीसींवर काय परिणाम होणार आहे याचा याबाबत कोण बोलणार? याचा विचार कोण करणार, याचं संरक्षण कोण करणार, काय करणार आहात, असंही लक्ष्मण हाकेंनी म्हटलं आहे.

Author : जयदीप मेढे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha