Dailyhunt
लेकाच्या जन्मानंतर नुकतेच आई-बाबा झालेले विक्की-कतरिना एकत्र स्पॉट; ऑल ब्लॅक लूकवर खिळल्या नजरा,  PHOTOs व्हायरल

लेकाच्या जन्मानंतर नुकतेच आई-बाबा झालेले विक्की-कतरिना एकत्र स्पॉट; ऑल ब्लॅक लूकवर खिळल्या नजरा, PHOTOs व्हायरल

ABP माझा 2 weeks ago

 Katrina Kaif Vicky Kaushal airport look: मागच्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात कतरिना कैफ आणि विकी कौशल पालक झाले होते. दोघांना विहान नावाचा मुलगा झाला.
 यानंतर विकी कौशल बऱ्याचदा स्पॉट झाला.

पण कतरिना कैफ ही लाइमलाइटपासून दूर होती. ती आपल्या फॅमिलीला विशेष वेळ देत आहे. आता काही महिन्यांनंतर हे दोघेही एकत्र स्पॉट झाले आहेत.

काल रात्री दोघेही एकत्र एअरपोर्टवर दिसले. पापाराझींनी या कपलच्याभोवती घेराव घातला, तसेच फोटोस क्लिक केले. पापाराझींसमोर दोघांनीही पोज दिल्या.

कतरिना आणि विक्की दोघांनीही ब्लॅक कलरचा आऊटफिट परिधान केला होता. दोघांनी ट्विनिंग केलं होतं. तर, विकीने ब्राऊन रंगाचा जॅकेट घातला.

दोघांचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळाला. तर, कतरिनाने खास ब्लॅक ओव्हरकोट घातला होता. तसेच दोघांनीही स्टायलिश शूज घातले होते.

दोघांनी आपल्या स्टाइलने लक्ष वेधून घेतलं होतं. दोघांचा सिंपल लूक क्लासी वाटत होता.

कतरिनाने मिनिमल मेकअप कॅरी केला होता. तसेच केस ओपन ठेवले होते. कतरिनाने गॉगल्सही घातले होते.

पापाराझींसमोर दोघांनीही पोज दिले. दोघेही आनंदात दिसत होते. बऱ्याच महिन्यांनंतर हे कपल एकत्र दिसल्याने चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha