Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Lucky Zodiac Signs : 29 मेचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! मिथुन, सिंहसह 5 राशींवर होणार धनवर्षाव, दिवसाच्या शेवटी बॅंक बॅलेन्स वाढणार

Lucky Zodiac Signs : 29 मेचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! मिथुन, सिंहसह 5 राशींवर होणार धनवर्षाव, दिवसाच्या शेवटी बॅंक बॅलेन्स वाढणार

ABP माझा 1 week ago

Lucky Zodiac Signs On 29 May 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, 29 मे 2026 (May 2026) चा दिवस फार खास असणार आहे. त्यानुसार उद्याचा दिवस शुक्रवार आहे. हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे.

तसेच, ग्रह-नक्षत्रांच्या चालीनुसार देखील उद्याचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. अशा वेळी कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) उद्याचा दिवस लकी असणार आहे ते जाणून घेणार आहोत.

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस फार खास असणार आहे. या काळात तुम्हाला करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी निर्माण होताना दिसतील. तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. तसेच, तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील. ग्रहांचा शुभ परिणाम या राशीच्या लोकांवर होणार आहे.

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांवर ग्रहांच्या संक्रमणाचा शुभ परिणाम होणार आहे. या काळात अनेक शुभ योग जुळून येतील. प्रवासाचे योग आहेत. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागेल. करिअरमध्ये प्रगतीचे योग जुळून येणार आहेत. जे तरुण नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच नवीन नोकरी मिळेल.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस चांगला जाणार आहे. या काळात तुमच्या पदोन्नतीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, नोकरीत प्रमोशन देखील मिळण्याची शक्यता आहे. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. अनेक नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभकारक असणार आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं शुभ फळ मिळेल. तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. व्यवसायाचा विस्तार अधिक वाढलेला दिसेल. मित्रांच्या सहकार्याने अनेक कार्य तुम्हाला सहज पूर्ण करता येतील.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी उद्याचा दिवस भाग्यशाली दिवसांपैकी एक असणार आहे. या काळात अनेक गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील. नवीन गोष्टी शिकण्याचा अनुभव तुम्हाला येईल. तसेच, तुम्हाला तुमचे रखडलेले पैसेही मिळतील. कामात तुमचं योगदान लाभेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

June 2026 Monthly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी जूनचा महिना कसा असणार? कोणत्या 3 राशींना लागणार लॉटरी, वाचा मासिक राशीभविष्य

Author : एबीपी माझा वेब टीम

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha