Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Lucky Zodiac Signs 3 July 2026 : 3 जुलैचा दिवस नशीब पालटणारा! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; अचानक होणार धनलाभ, वाचा लकी राशी

Lucky Zodiac Signs 3 July 2026 : 3 जुलैचा दिवस नशीब पालटणारा! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; अचानक होणार धनलाभ, वाचा लकी राशी

ABP माझा 1 week ago

Lucky Zodiac Signs 3 July 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 3 जुलैचा दिवस म्हणजेच शुक्रवारचा दिवस आहे. हा दिवस देवी लक्ष्मीला (Goddess Lakshmi) समर्पित आहे. ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींनुसार, उद्याचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे.

कारण उद्याच्या दिवशी शुक्र ग्रहाचं परिवर्तन होणार आहे. तसेच, लवकरच शनिचं देखील नुकतंच नक्षत्र परिवर्तन झालं आहे. त्यामुळे उद्या कोणत्या 5 राशींना लाभ मिळणार आहे. हा दिवस कोणत्या राशींसाठी लकी असणार आहे? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस लाभदायी असणार आहे. तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, तुमचा सकारात्मक दृष्टीकोन राहील. तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढलेली दिसेल. उद्याच्या दिवसात तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळू शकते.

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी उद्याचा दिवस भाग्याचा असणार आहे. तुमच्या सुख-समृद्धीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. काही जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. कामाच्या ठिकाणी तुमचं मन रमेल.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी उद्याचा दिवस चांगला असणार आहे. समाजात तुमची चांगली प्रतिमा निर्माण होईल. तसेच, घरातील वातवारण आनंदी असणार आहे. वैवाहिक जीवनात सुख शांती नांदेल. मित्रांच्या सहकार्याने तुमची सगळी कामे वेळेत पूर्ण करता येतील. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल.

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी उद्याचा दिवस लाभदायी असणार आहे. या कालावधीत तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळू शकते. तसेच, तुमच्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळेल. करिअरच्या बाबतीत काही चढ-उतार जाणवतील. तसेच, पार्टनरबरोबर तुम्ही एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करु शकता.

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी उद्याचा दिवस सकारात्मक असणार आहे. या काळात तुमच्यातील कलागुणांना चांगना न्याय मिळेल. तसेच, एखाद्या नवीन कार्याची सुरुवात तुम्ही करु शकता. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. तसेच, नात्यात गोडवा वाढलेला दिसेल.

इतर बातम्या :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Shukra Gochar 2026 : शुक्र-केतूच्या संयोगाने 4 राशींचं नशीब पालटणार; 4 जुलैपासून धनसंपत्तीत होणार भरभराट, श्रीमंतीत जगतील राशी

Author : एबीपी माझा वेब टीम

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha