Mumbai Vasai Rain : राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विशेषत: मुंबईसह ठाणे पालघर आणि कोकणातही जोरदार पाऊस पडत आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही भागात देखील चांगला पाऊस पडत आहे.
अशातच वसईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वसईत पुराच्या पाण्यात पोहत असताना एक जण बुडाल्याची घटना घडली आहे. किशोर लोखंडे वय 55 असं बुडालेल्या व्यक्तीचं नाव आहे. मद्यपान करुन पोहत असताना पाण्याच्या प्रवाहत हा व्यक्ती वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. वसई पूर्वेच्या राजवली रोड भोईदा पाडा इथं ही घटना घडली आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडून शोध मोहिम सुरू करण्यात आली होती. रात्रीच्या सुमारास त्याचा मृतदेह मिेळाला आहे.
दहिसर पश्चिम मध्ये मिठी नदीत युवक पडल्याची घटना
मुंबईतील दहिसरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. दहिसर पश्चिम मध्ये मिठी नदीत युवक पडल्याची घटना घडली आहे.मुसळधार पावसादरम्यान युवकाचा नदीत तोल जाऊन पडल्याची माहिती मिळाली आहे.
रेस्क्यू ऑपरेशनचा थरार कॅमेऱ्यात कैद
दहिसर पश्चिम मध्ये मिठी नदीत युवक पडल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर अग्निशमाक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ट्यूब आणि दोरीच्या साहाय्याने युवकाचे थरारक रेस्क्यू करण्यात आलं आहे. सुमारे 15 फूट उंचीवरुन दोरीच्या मदतीने युवकाला बाहेर काढण्यात आलं आहे. रेस्क्यू ऑपरेशनचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळं युवकाचा जीव वाचला आहे. पावसाळ्यात नद्या व नाल्यांच्या परिसरात नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबईसह ठाणे, रायगड, पालघरमध्ये मुसळधार पाऊस सुरु
मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर असेल पुण्याचा काही भाग, नाशिक याठिकाणी मुसळधार पाऊस आहे. कालपासून आपण वेगवेगळे अलर्ट दिले आहेत. या भागात सातत्याने 6 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस असेल, वादळंही येतील. तसेच या भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. आपण दर तीन तासांनी आपण या भागातील नागिरकांना एसएमएस पाठवत आहोत. शाळांना सुट्टी दिली आहे. लोकांन विनंती केली आहे की, प्रवास टाळता आला तर टाळला पाहिजे, गरज असेल तरच घराबाहेर पडा. आता ज्याप्रकारे पाऊस आणि वादळ आहे काही अपघात होऊ नयेत म्हणून प्रशासनाकडून अलर्ट पाठवले जात आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. माझी लोकांना विनंती आहे की, आपण नीट अलर्ट देतोय , लोकांनी ते अलर्ट फॉलो करावेत, शक्यतो त्याप्रमाणे बाहेर पडावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
Author : प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा

