गुजरातमधील सुरत जिल्ह्यात अत्यंत थरकाप उडवणारी भीषण अपघाताची घटना घडली, बारडोली जवळून जाणाऱ्या धुळे हायवेवर (Dhule Highway) महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या दोन बस समोरासमोर धडकल्या.
अपघात इतका भयानक होता की, धडकेनंतर एक एसटी बस थेट महामार्गावर उलटली आणि क्षणार्धात बसला भीषण आग लागली. या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने 7 प्रवाशांचा जागीच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला
बारडोली येथे झालेल्या एसटी अपघातातील एक जळगाव जिल्ह्यातील जामनेर आगाराची असल्याची माहिती समोर आली असून जामनेर सुरत ही बस होती.
जामनेरवरून सुरतकडे जात असताना बारडोली जवळ हा अपघात झाला असून या अपघातात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
दरम्यान या अपघातात जामनेर एसटी आजारातील चालक घनश्याम राघव बरकले यांचा देखील या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती जळगाव एस टी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे
बसमधील चालक सोपान नामदेव क्षीरसागर हे गंभीर जखमी असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सकाळी 7.30 वाजता जामनेर आगाररातून ही बस सुरतकडे निघाली होती साधारण दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास बारडोलीजवळ हा अपघात झाला
दरम्यान, या भीषण अपघातामुळे धुळे-सुरत हायवेवर दोन्ही बाजूंनी अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या

