Operation Tiger UBT Shivsena: राज्याच्याराजकीयवर्तुळातपुन्हाएकाराजकीय भूकंपाचाप्रत्ययआलाआहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्याकेंद्रस्थानीअसलेल्या ऑपरेशन टायगरची चर्चा आता प्रत्यक्षात आली आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे गटाचे सहा खासदार फोडण्यात यश मिळवले आहे. या सहा खासदारांना घेऊन एकनाथ शिंदे हे बुधवारी सकाळी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या दिल्लीतील कार्यालयात गेले होते. याठिकाणी ठाकरे गटाच्या 6 बंडखोर खासदारांनी आपण स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र लोकसभा अध्यक्षांना देत शिंदे गटाला पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट केले. यानंतर लोकसभा अध्यक्षांनी सहा बंडखोर खासदारांच्या या स्वतंत्र गटाला मंजुरी दिली. पक्षांतरबंदी कायद्यानुसार लागणारे दोन तृतीयांश खासदार फुटल्यामुळे या गटातील खासदारांवर कोणतीही कारवाई होऊ शकत नाही. त्यामुळे आता सहा खासदारांचा हा गट लवकरच शिवसेनेत विलीन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, पक्षफुटीनंतरपरतएकदा राजकीय वर्तुळात उलटसुलटचर्चा, दावे-प्रतिदावेआणिआरोपप्रत्यारोपहोतआहे. एकंदरीतसंध्या महाराष्ट्रात कोणत्या पक्षाकडे किती खासदार आहेतहेआपणजाणूनघेऊया. (Maharashtra Politics news)
| पक्ष | 2024 च्यानिकालानंतर | 2026च्यापक्षफुटीनंतर |
| काँग्रेस | 14 | 14 |
| राष्ट्रवादी (श.प) | 08 | 8 |
| शिवसेना (ठाकरेगट) | 09 | 3 |
| शिवसेना | 07 | 13 |
| भाजप | 09 | 9 |
| राष्ट्रवादी | 01 | 1 |
Shivsena news: ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे
1. अनिल देसाई
2. अरविंद सावंत
3. संजय दिना पाटील
4. राजाभाऊ वाजे
5. संजय जाधव
6. संजय देशमुख
7. नागेश पाटील आष्टीकर
8. ओमराजे निंबाळकर
9. भाऊसाहेब वाकचौरे
Shivsena MPs: कोणते खासदार शिंदे गटात गेले?
1. संजय जाधव
2. संजय देशमुख
3. नागेश पाटील आष्टीकर
4. ओमराजे निंबाळकर
5. भाऊसाहेब वाकचौरे
6. संजय दिना पाटील
Shivsena UBT MP: काय आहे 'ऑपरेशन टायगर'?
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर' ही चर्चेचा विषय बनली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नऊ खासदारांपैकी सात खासदार पक्षांतर करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. ठाकरेंचे हे खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत लवकरच प्रवेश करतील असा दावा केला जात आहे.
Operation Tiger UBT Shivsena: ऑपरेशन टायगरला कसा मिळाला ग्रिन सिग्नल ?
एनडीए घटकपक्षांची दिल्लीत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला एकनाथ शिंदे हजर होते. या बैठकीमध्ये अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात ऑपरेशन टायगर संदर्भात चर्चा झाली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींची संमती आवश्यक होती. त्याचवेळी अमित शाह यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून या ऑपरेशनसाठी संमती मिळवली. मोदींनी संमती दिल्यानंतर अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही वेळानंतर एक बैठक घेतली. या बैठकीत अमित शाह यांनी अंतिम ग्रिन सिग्नल दिला. त्यामुळे ऑपरेशनसाठी हालचाली सुरू झाल्या. तांत्रिक गोष्टी तपासण्यात काही दिवस गेले. येणाऱ्या खासदारांची संमती आणि कागदपत्रे या दरम्यान घेण्यात आली. खरं तर ३ महिन्यापूर्वी जेव्हा ऑनलाइन बैठक झाली, तेव्हाच हे ऑपरेशन होणार होते. तेव्हाच सर्व खासदार तयार देखील होते. पण एक अडचण होती. ती अडचण दूर झाल्यानंतर आता ऑपरेशन टायगर सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Author : विशाल देवकर

