Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Mahavtar vicky Kaushal:'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन

Mahavtar vicky Kaushal:'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन

ABP माझा 2 weeks ago

Mahavtar Movie Vickey Kaushal: अभिनेता विकी कौशल लवकरच 'महावतार' या बहुचर्चित पौराणिक-ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तो भगवान परशुराम अर्थात चिरंजीवी परशुराम यांची भूमिका साकारणार असून, या भूमिकेसाठी विकी मोठं ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे.

'छावा'मधील दमदार लूकनंतर आता तो आणखी मोठं फिटनेस चॅलेंज स्वीकारणार आहे.

25 किलोहून अधिक वजन वाढवणार

'मिड-डे'च्या वृत्तानुसार, विकी कौशल या भूमिकेसाठी तब्बल 25 किलोहून अधिक वजन वाढवणार आहे. आपल्या व्यक्तिरेखेत पूर्णपणे समरस होण्यासाठी तो विशेष तयारी करणार असून, सप्टेंबरपासून सेलिब्रिटी फिटनेस प्रशिक्षक तेजस लालवानी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सुरू करणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण डिसेंबर 2026 मध्ये सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.

परशुरामांच्या भूमिकेसाठी खास तयारी

दिग्दर्शक अमर कौशिक यांच्या दिग्दर्शनाखाली साकारत असलेल्या 'महावतार'मध्ये विकी कौशल भगवान परशुरामांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान करत आहेत. हा चित्रपट डिसेंबर 2027 किंवा 2028 मध्ये प्रदर्शित करण्याची निर्मात्यांची तयारी आहे. सध्या हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आगामी चित्रपटांपैकी एक मानला जात आहे.

'लव्ह अँड वॉर'साठीही घेतली विशेष मेहनत

'महावतार'व्यतिरिक्त विकी कौशल संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटातही दिसणार आहे. 'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृत्तानुसार, या चित्रपटात विकी एअर फोर्स पायलटच्या भूमिकेत झळकणार असून, त्यासाठीही त्याने विशेष मेहनत घेतली आहे. आपल्या दोन्ही आगामी चित्रपटांसाठी विकी कौशल शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कसून तयारी करत असल्याचे सांगितले जात आहे.

Author : abp majha web team

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha