Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Maniesh Pauls Mother Death: टीव्ही होस्ट मनीष पॉलवर दुखा:चा डोंगर, आईचे निधन; अभिनेता शोकसागरात बुडाला

Maniesh Pauls Mother Death: टीव्ही होस्ट मनीष पॉलवर दुखा:चा डोंगर, आईचे निधन; अभिनेता शोकसागरात बुडाला

ABP माझा 1 week ago

Maniesh Paul Mothers Death: सिनेसृष्टीतून एक दु:खद घटना समोर आली आहे. अॅक्टर आणि फेमस टीव्ही होस्ट मनीष पॉल (Maniesh Paul) याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मनीष पॉलची आई ऊर्मील पॉल (Urmil paul Death) यांचं निधन झालं आहे.

त्यांचा मृत्यू दिल्ली येथे झाला आहे. 77 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असल्याची माहिती आहे. दरम्यान, उर्मिल पॉल यांचं निधन नेमकं कोणत्या कारणामुळे झालं? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, मनीष पॉलच्या आईच्या निधनाची बातमी कुटुंब आणि बी-टाऊनमधील कलाकारांना कळताच त्यांना दु:ख झाले आहे.

फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, मनीषने अद्याप या ह्रदयद्रावक घटनेवर प्रतिक्रिया दिलेली नाही. अथवा आपल्या आईच्या निधनावर अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. मनीष पॉलचे आपल्या आईसोबत खूप चांगले बॉण्ड होते. त्याने आपल्या आईसोबतच्या खास नात्याबद्दल अनेकदा सांगितले आहे. 'सारेगमप लिटल चॅम्प्स 2020'मध्ये असताना मनीषला सरप्राईज मेसेज मिळाला होता. त्याच्या आईने व्हिडीओ तयार करुन पाठवला होता.

मनीष पॉलवर दुखा:चा डोंगर, आईचे 77 व्या वर्षी निधन (Maniesh Paul mother Urmila Paul passes away)

व्हिडीओ मेसेज मिळाल्यानंतर मनीष पॉल प्रचंड भावुक झाला होता. त्याने कबूल केले होते की, कोरोना काळात आईपासून दूर राहणं त्याला कठीण जात होतं. लॉकडाऊनमधील काळ हा त्याच्या आयुष्यातील कठीण काळापैकी एक होता. 'माझ्यासाठी हा खरंच हा एक भावुक क्षणांपैकी एक होता. कारण 8 महिने मी घरापासून दूर होतो. मी माझ्या आईला प्रत्यक्ष जाऊन भेटू शकलो नाही'.

'मला तिची आठवण येते. माझी आई माझ्यासाठी सर्वस्व आहे. तिच्याबद्दल बोलताना माझ्याकडे शब्द अपुरे पडतात. मी आतापर्यंत जे काही यश मिळवले आहे, त्याचे श्रेय मी माझ्या आईला देतो', असं मनीष म्हणाला होता. यावरुन मनीषचे आपल्या आईसोबतचे बॉण्ड किती घट्ट आहे, हे दिसून येते. मनीष पॉल सोशल मीडियात प्रचंड सक्रीय असतो. तो बऱ्याचदा आपल्या आईसोबतचे फोटो शेअर करत असतो. दरम्यान, मनीष पॉलवर दुखा:चा डोंगर कोसळल्यानंतर त्याच्या चाहत्यांनाही दु:ख झाले आहे. त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

इतर बातम्या:

'देऊळ बंद 2'वर स्वामींची कृपा; 10 कोटी बजेटमध्ये तयार झालेल्या सिनेमानं किती प्रॉफिट कमावला?

Author : एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha