Dailyhunt
Mankhurd Traffic Jam : 15 मिनिटांच्या अंतरासाठी 5-6 तास वाहतूक कोंडी, मानखुर्द क्रेन दुर्घटनेनंतर प्रवाशांचे अतोनात हाल, पाणी नाही, टॉयलेट, बाथरूम नाही; सोशल मिडीयावर नागरिकांचा संताप

Mankhurd Traffic Jam : 15 मिनिटांच्या अंतरासाठी 5-6 तास वाहतूक कोंडी, मानखुर्द क्रेन दुर्घटनेनंतर प्रवाशांचे अतोनात हाल, पाणी नाही, टॉयलेट, बाथरूम नाही; सोशल मिडीयावर नागरिकांचा संताप

ABP माझा 1 week ago

मुंबई: सायन पनवेल महामार्गावर मानखुर्द जवळ निर्माण मोठ्या प्रमाणावर झालेली वाहतूक कोंडी (Mankhurd Traffic Jam) अखेर रात्री उशिरा पोलिसांनी सुरळीत केल्याचं पाहायला मिळालं. मंगळवारी रात्री मानखुर्द जवळ (Mankhurd Traffic Jam) सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी आणलेल्या क्रेनचा एक भाग कोसळला आणि त्या घटनेत एका नागरिकाचा मृत्यू झाला.

त्यानंतर सदर क्रेनचा भाग काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले आणि यामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीचा (Mankhurd Traffic Jam) फटका मुंबईहून पुण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर बसला. १५ मिनिटांच्या अंतरासाठी तब्बल ५ ते ६ तास वेळ लागल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. ना पाणी प्यायला नाही, मधुमेहाच्या रुग्णांना टॉयलेट, बाथरूम नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती. आता सायन पनवेल महामार्गावरील मानखुर्द आणि चेंबूरहून येणारी वाहतूक सुरळीत झाली आहे.(Mankhurd Traffic Jam)

Mankhurd Traffic Jam : १५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास प्रवासी अडकले वाहतूक कोंडीत

मानखुर्द क्रेन दुर्घटनेनंतर प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागला. १५ मिनिटाच्या अंतरासाठी चालक ५ ते सहा तास कोंडीत अडकले होते. पडलेले क्रेन बाजूला करण्यासाठी बुधवारी संपूर्ण रस्ताच काही तासांसाठी अडवून ठेवल्याने कोंडीत भर पडली.योग्य नियोजन न केल्याचा त्याचा फटका बसल्याचं बोलत नागरिकांनी, प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

Mankhurd Traffic Jam : नेमकी कशामुळे झाली वाहतूक कोंडी?

वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी मानखुर्द परिसरात दोन उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. रस्त्याच्या बाजूला पत्रे लावून पिलर उभारण्यासाठी मोठ्या मशीन मार्फत खोदकाम सुरू आहे. त्यामुळे या भागात आधीच मोठ्या प्रमाणात कोंडी होते. त्यात, मंगळवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास खोदकाम सुरू असताना रस्त्याच्या मधोमध क्रेन कोसळली. यात एकाचा बळी गेला. बुधवारी दुपारी क्रेन बाजूला करण्याच्या कामाला सुरुवात झाली. त्यामुळे रात्रीपासूनच कोंडीत भर पडली. मशीनचे वजन जास्त असल्याने तिला बाजूला करण्यासाठी रस्त्याच्या मधोमध मोठी क्रेन उभी करण्यात आली. मात्र या क्रेनमुळे मुंबईहून नवी मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली. तर चेंबूर ते मानखुर्द हे १२ ते १५ मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना पाच ते सहा तास कोंडीत अडकावे लागले होते.

अनेकांकडे पाणी नव्हते, काही वेळाच्या प्रवासासाठी निघालेले प्रवासी तासनतास गाडीत अडकून पडले. अनेकांच्या गाडीत पिण्याचे पाणीही नव्हते. त्यातबरोबर, लहान मुलं, वयोवृध्द यांना देखील या कोंडीचा फटका बसला. मधुमेहाच्या रुग्णांना टॉयलेट बाथरूम नाही. उलटे फिरून परत जाता येत नाही, अशा स्थितीत नागरिक अडकले. अनेक अडकलेल्या प्रवाशांनी सोशल मिडीयावरती पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे.

Mankhurd Traffic Jam : हे खूप भयंकर आहे...अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी देखील मानखुर्द मार्गे पुण्याला जात असताना या कोंडीत पाच तास अडकल्यानंतर संताप व्यक्त करत पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर रात्री अकरा वाजता याबाबतचा व्हिडीओ शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. सोनाली यांनी सांगितले, गेल्या पाच तासापासून मानखुर्दमध्ये अडकले आहे. पोलिसांना विचारताच त्यांनी सांगितले की ही कोंडी वाईट असून पेशन्स ठेवा. तसेच कोंडी कधी संपेल याबाबत सांगता येणार नाही. याची कृपा करून काहीतरी माहिती द्या. इथून आम्ही परत मागे जाऊही शकत नाही.

सोनाली आपल्या गाडीने बुधवारी रात्री पुण्याच्या दिशेने निघाली होती. पण, या प्रवासादरम्यान रस्त्यात मानखुर्द ब्रिजवर ती जवळपास पाच तास वाहतूक कोंडीत अडकली. एकाच ठिकाणी पाच तास खोळंबल्यामुळे तिच्यासह अडकलेल्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. याचा व्हिडीओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच मानखुर्द ब्रिजवर कशाप्रकारे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या, हेदेखील तिच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

Author : निलेश बुधावले, एबीपी माझा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha