Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मनोज जरांगेंच्या आंदोलनाला भेट देणार अभिजीत दिपके; CJP संस्थापक म्हणाले, पाटील सर चुकीचं मागत नाहीत

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला भेट देणार अभिजीत दिपके; CJP संस्थापक म्हणाले, पाटील सर चुकीचं मागत नाहीत

ABP माझा 1 week ago

Abhijit Dipke on Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी कालपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही, असी भूमिका त्यांनी घेतलीय. दरम्यान, त्यांच्या या आंदोलनासंदर्भात कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके (Abhijit Dipke) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर सरकारने समाजाच्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं असतं आणि रोजगाराचे संधी दिली असती तर मनोज जरांगे सरांना आंदोलन करावं लागलं असतं का? असा सवाल दिपकेंनी उपस्थित केला. हे कुठून कुठे सरकारचा अपयश आहे, आज राज्यात सगळेजण आंदोलन करत आहेत असे दिपके म्हणाले. मराठा समाजाच्या मुलांना शिक्षण चांगलं मिळत नाही, रोजगाराची संधी त्यांना मिळत नाहीत असे दिपके म्हणाले. मी मनोज जरांगे सरांना भेटणार असल्याचेही दिपके म्हणाले.

मनोज जरांगेंसोबत बसा चर्चा करा आणि काही नाही काही तोडगा काढा

मनोज जरांगे सर यांना आंदोलन करण्याची आज वेळ का आली? जेव्हा एखादा व्यक्ती आंदोलन करतो तेव्हा त्याच्या समोरचं ते लास्ट ऑप्शन असतं तिथं सरकार त्यांना मजबूर करते. जर सरकारने समाजाच्या मुलाला चांगलं शिक्षण दिलं असतं आणि रोजगाराचे संधी दिली असती तर मनोज जरांगे सरांना आंदोलन करावा लागला असता का? असा सवाल दिपकेंनी केला. हे कुठून कुठे सरकारचं अपयश आहे, आज राज्यात सगळेजण आंदोलन करत आहेत. मराठा समाजाच्या मुलाचे शिक्षण चांगलं झालं नाही रोजगाराची संधी त्यांना सुद्धा मिळत नाही. हे सरकारचं अपयश आहे की त्यांना आंदोलन करावं लागत आहे. आम्हाला तरी कुठं आवडतं होतं. आम्हाला जंतर-मंतरवर जसं 35 दिवस सरकारने बसून ठेवलं होतं. सरकारला माझी विनंती आहे की 31 दिवसानंतर तुम्ही आमच्या सोबत डायलॉग करायला आले, मनोज जरांगे सरांसोबत तुम्ही असं करु नका, त्यांच्यासोबत बसा चर्चा करा आणि काही नाही काही तोडगा काढा असे दिपके म्हणाले.

मनोज जरांगे पाटील काही चुकीचं मागत नाहीत

मनोज जरांगे पाटील काही चुकीचं मागत नाहीत, मराठा समाजाच्या मुलांसाठी शिक्षणाचा अधिकार मागत आहेत असे दिपके म्हणाले. रोजगाराचा अधिकार मागत आहेत. याची गरज यासाठी पडली आहे की सरकार त्या दोन गोष्टीवर पूर्णपणे अपेक्षित आहे. मी जरांगे पाटील यांनी नक्की भेटणार आहे. ते दिल्लीपर्यंत आले होते, मी इथपर्यंत जाऊ शकतो. मनोज जरांगे सरांना भेटायला मी नक्की जाईल असेही दिपके म्हणाले.

जंतर-मंतरवर जे आंदोलन झालं होतं त्यापेक्षा मोठं आंदोलन होणार

बॉम्बे हायकोर्टाचे टायपिंग परीक्षा रद्द झाली आहे. बोर्ड मध्ये प्रॉब्लेम होता की अजून काही अडचणी होत्या. परीक्षा पुन्हा घेण्यात याव्यात अशी मागणी होती ती मागणी पूर्ण झाली आहे असे दिपके म्हणाले. यापुढे ज्या काही परीक्षा होतील ज्या सेंटरवर प्रॉब्लेम आले होते त्या सेंटरवर परीक्षा घेण्यात येऊ नये असे दिपके म्हणाले. विद्यार्थ्यांवर जे गुन्हे दाखल केले होते त्या मागण्या अजूनही मान्य झाल्या नाहीत. त्यामुळं आम्हाला नाविलाजाने आंदोलन करावं लागत असल्याचे दिपके म्हणाले. सरकार म्हणत होते की कोर्टामुळे आम्हाला ते करता येत नाही पण कोर्ट म्हणून आम्ही तयार आहोत तुम्ही फक्त लिस्ट द्या मात्र सरकार लिस्ट देत नाही देत नाही असेही ते म्हणाले. जंतर-मंतरवर जे आंदोलन झालं होतं त्यापेक्षा मोठं आंदोलन होणार आहे असेही ते म्हणाले. आदिवासी मुलं आंदोलनाला बसली आहेत देशातील असं एकही राज्य नाही की जिथे आंदोलन सुरू नाही असे दिपके म्हणाले.

Author : डॉ. कृष्णा केंडे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha