Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Maratha Reservation: अपात्र ठरवण्याचा अधिकार कोणालाही दिलेला नाही, मंत्री मसुद्यातील त्रुटी अन् उणीवा मनोज जरांगेंनी कळवाव्या; राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंतांकडून चर्चेचं आवाहन

Maratha Reservation: अपात्र ठरवण्याचा अधिकार कोणालाही दिलेला नाही, मंत्री मसुद्यातील त्रुटी अन् उणीवा मनोज जरांगेंनी कळवाव्या; राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंतांकडून चर्चेचं आवाहन

ABP माझा 6 days ago

Radhakrishna Vikhe Patil Uday Samant : शासनाची भुमिक मांडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकारी मनोजजरांगेपाटील (Manoj Jarange Patil)यांच्याकडे गेले होते. मसुदा त्यांना देण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मान्यतेने हा मसुदा तयार केला होता.

मी, उदय सामंत, प्रसाद लाड आम्ही सगळ्यांनी मसुदा तयार करुन सादर केलेला आहे. सरकारची भुमिका त्यांच्याकडे मांडलेली आहे. मसुद्यात कोणती उणीव त्यांना वाटते, यावर त्यांचा प्रतिसाद मिळेल, त्याप्रमाणे पुढे निर्णय करु. सरकारी अधिकाऱ्यांपेक्षा मंत्र्यांनी यावं, अशी जरांगेपाटील यांनी अपेक्षा व्यक्त केली. मात्र मुद्दा असा आहे की, मंत्री समितीने तयार केलेला मसुदा आपण दिलेला आहे. मसुद्यावर उणीवा त्यांनी मांडायला पाहिजे होत्या. अजून वेळ गेलेली नाही. त्यांना काय उणीवा आहेत. त्यांनी त्या मांडाव्यात. त्यानुसार निर्णय घेऊ. अशीप्रतिक्रिया मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनीदिलीआहे.

दरम्यान, कोण पात्र आहे, हे ठरवण्याचा अधिकार कोणीही दिलेला नाही. जिल्हाधिकारी शासनाचे प्रतिनिधी म्हणून गेले आहे. त्यांनी शासनाची भुमिका मांडलेली आहे. त्यांनी आम्ही दिलेल्या मसुद्यावर बोलावं. असेदेखील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनीम्हणाले.

Radhakrishna Vikhe Patil: 58 लाख नोंदी ग्रामपंचायत समोर मांडू. मात्र लोकांनी अर्ज तर करायला हवा ना

जिल्हाधिकारी मंत्री समितीने तयार केलेला मसुदा घेऊन गेले होते. आमचे प्रतिनिधी होते त्यांना बोलायला हवे होते. आम्ही सकारात्मक आहोत, बऱ्याच अंशी निर्णययातून माहिती पुढं आली आहे. काही त्रुटी असेल तर सांगावे, म्हणजे आम्हाला कळेल. 58 लाख नोंदी ग्रामपंचायत समोर मांडू. मात्र लोकांनी अर्ज तर करायला हवा ना, आम्ही कार्यवाही कशी होणार हे त्यांना सांगितलं आहे. आम्ही प्रतिष्ठेचा प्रश्न केला नाही. बहुतांश मागण्यांना प्रतिसाद दिला आहे. मराठा समाजाच्या प्रश्नापुढे कोण काय भाषा वापरतो याबद्दल मला काही करायचं नाही, मात्र लोकशाहीत काय बोलावे, काय नाही याबाबत निर्बंध प्रत्येकाला असायला हवे, असेही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

Uday Samant: संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीवर बोलताना मनोज जरांगे यांनी विचार करावा

मसुदा पाठवला असूनतो सकारात्मक आहे. जरांगे पाटलांना सांगितले आहे आम्हला इगो नाही. आम्ही प्रश्न सोडवायला आलो आहे. त्रुटी सांगा म्हणजे अंतिम मसुदा तयार होईल. मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे. आजही विनंती करतोय, मसुदा सकारात्मक आहे. त्यांनी ही सकारात्मक विचार करावा, सरकार चर्चेला आले आहे. मसुद्यावर चर्चा करावी लागेल. बोलण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, मात्र विखे पाटील, एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री फडणवीस या सगळ्यांनी सकारात्मक काम केले आहे, अनेक बाबी पुढं नेल्या आहेत. संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीवर बोलताना मनोज जरांगे यांनी विचार करावा, असे आम्हाला वाटते. आम्ही सकारात्मक आहोत म्हणून आलोय ना. त्यांची चिडचिड होत असेल पण आम्ही सकारात्मक आहोत. उद्या सकाळपर्यंत मसुद्याला त्यांनी उत्तर द्यावे अपेक्षा आहे. अशीप्रतिक्रियाउद्योगमंत्रीउदयसामंतयांनीदिली.

Uday Samant: मुद्दा प्रतिष्ठेचा नाही आम्ही सकारात्मक आहोत, जरांगे यांनी तब्येतीची काळजी घ्यावी

आम्ही पूर्णपणे सकारात्मक आहोत, सकारात्मक निर्णय घेतलेले आहेत. आम्हाला त्यांच्या तब्येतीची काळजी आहे, म्हणूनच आम्ही इथे आलोय. आम्ही जो मसुदा पाठवलाय तो जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवण्याचं कारण की काही बदल असतील तर ते करता येऊ शकतील. त्यांनीही सकारात्मक पद्धतीने चर्चेला यायला हवं. प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनीही 10 टक्के आरक्षण असेल, असे निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यासाठी अनेक हिताचे निर्णय घेतले आहेत. आम्ही त्यांचे हितचिंतक आहोत. पण संविधानिक पदावर असलेल्यांबद्दल जरा सांभाळून बोलायला हवं. आम्ही सकारात्मक आहोत म्हणूनच चर्चेसाठी आलोय, आम्ही सकारात्मक आहोत तर त्यांनीही सकारात्मकच राहायला हवं अशीप्रतिक्रियामंत्री उदय सामंत यांनीदिली.

Author : डॉ. कृष्णा केंडे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha