Dailyhunt
Marathi Actor Rohan Gujar: 'होणार सून मी ह्या घरची' फेम अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा; बाळांची झलक दाखवत नावंही सांगितली

Marathi Actor Rohan Gujar: 'होणार सून मी ह्या घरची' फेम अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा; बाळांची झलक दाखवत नावंही सांगितली

ABP माझा 3 days ago

Rohan Gujar: 'होणार सुन मी या घरची ' मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता रोहन गुजर सध्या चर्चेत आहे. टेलिव्हिजन विश्वातील हे लोकप्रिय अभिनेता जुळ्या मुलांचा बाबा झालाय. अलीकडेच instagram वर त्याने त्याच्या चाहत्यांनाही गुड न्यूज शेअर केली आहे.

दोघांची नावे ही त्याने सांगितली असून जुळ्या मुलांचा फोटोही त्याने शेअर केलाय.काही महिन्यांपूर्वीच रोहनने बाबा होणार असल्याची गुड न्यूज त्याच्या चाहत्यांना दिली होती. लग्नाच्या आठ वर्षांनी रोहन आणि पत्नी स्नेहल आई बाबा झाले आहेत. बाळाच्या जन्माने दोघेही आनंदात आहेत. त्याच्या या पोस्टवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत. दोघांनाही शुभेच्छा देत आहेत.

रोहन गुजर झाला जुळ्या मुलांचा बाबा

लोकप्रिय टीव्ही अभिनेता रोहन गुजर याने नुकत्याच केलेल्या एका पोस्टची जोरदार चर्चा आहे. या पोस्टवर अनेक कलाकारांनी त्याच्या जवळच्या लोकांनी त्याला शुभेच्छा दिल्यात. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या जुळ्या बाळांचा फोटो पोस्ट केलाय. रोहन नुकताच बाबा झाला. काही दिवसांपूर्वीच त्याने तो बाबा होणार असल्याचं चहा त्यांना सांगितलं होतं. आता त्याने त्याच्या जुळ्या बाळांचा एक फोटो पोस्ट करत त्यांची नावं जाहीर केली आहेत.रोहनला एक मुलगी आणि एक मुलगा झालाय. मोठी मुलगी आणि धाकटा मुलगा. मुलीचं नाव त्याने आद्या स्नेहल रोहन गुजर असं ठेवलंय. तर मुलाचं नाव अद्वय स्नेहल रोहन गुजर असं ठेवलंय . त्याने या पोस्टमध्ये 'तीन महिने दोन हृदय आणि एक कुटुंब ' असे म्हटले आहे.

त्याच्या या पोस्टवर त्याचे चाहते आणि अनेक कलाकार त्याला शुभेच्छा देताना दिसतात. रोहन गुजरने अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. होणार सुन मी या घरची या मालिकेत जान्हवीचा भाऊ पिंट्याच्या भूमिकेत तो दिसला .या भूमिकेने त्याला घराघरात लोकप्रियता मिळवून दिली .नंतर तो लव्ह लग्न लोचा, साथ दे तू मला, सांग तू आहेस का, बन मस्का, नवी जन्मेन मी अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं. काही वेब सिरीजमध्येही तो दिसला. सध्या तो आमने-सामने या नाटकाच्या प्रयोगात व्यस्त आहे.

Author : जयदीप मेढे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha