Dailyhunt
May 2026 Monthly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी उद्यापासून सुरु होणारा मे महिना कसा असेल? कोणत्या 3 राशींचं नशीब पालटणार? मासिक राशीभविष्य

May 2026 Monthly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी उद्यापासून सुरु होणारा मे महिना कसा असेल? कोणत्या 3 राशींचं नशीब पालटणार? मासिक राशीभविष्य

ABP माझा 2 weeks ago

May 2026 Monthly Horoscope : एप्रिल (April 2026)महिना संपून उद्यापासून मे (May 2026) महिन्याला सुरुवात होणार आहे. मेचा महिना अनेक आव्हानं आणि शुभवार्ता घेऊन येणार आहे. त्यामुळे आपल्यासाठी नवीन महिना कसा असेल?

याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे. यासाठीच या ठिकाणी आपण मेष ते कन्या राशींचं मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope) जाणून घेणार आहोत.

मेष रास (Aries May 2026 Monthly Horoscope)

मेष राशीच्या लोकांची मेची सुरुवात काहीशी हळुवार गतीने असेल. तसेच, तुम्ही ज्या पद्धतीने विचार करताय गोष्टी तशाच पद्धतीने घडताना दिसतील. जे लोक सिंगल आहेत त्यांना लाईफ पार्टनर किंवा जोडीदार भेटण्याची शक्यता आहे. अनेक नवीन गोष्टींचा अनुभव तुम्हाला मे महिन्यात घेता येईल. कामाच्या बाबतीत स्थिरता तुम्हाला जाणवेल. तसेच, आर्थिक बाबतीत तुमची सुरुवात फार चांगली असणार आहे. मागच्या महिन्याचा आदर्श घेऊन या महिन्यात त्या चुका टाळता येतील याचा प्रयत्न करा.

वृषभ रास (Taurus May 2026 Monthly Horoscope)

वृषभ राशीसाठी मे महिना भाग्यशाली असणार आहे. या कालावधीत तुमच्या करिअरच्या बाबतीत तुम्ही शिखरावर पोहोचाल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला थोडी चिंता करण्याची गरज आहे. बाहेरचे अन्नपदार्थ खाणं टाळा. तसेच, या कालावधीत घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. प्रवासाचे योग जुळून येतायत. तुमच्या शत्रूंपासून चार हात लांबच राहा. तुमच्या कामात अडथळे येतील. मात्र, त्याचा धैर्याने सामना करणं गरजेचं आहे.

मिथुन रास (Gemini May 2026 Monthly Horoscope)

मिथुन राशीसाठी मेचा महिना चांगला असणार आहे. या काळात प्रवासाला जाण्याचे योग जुळून येतायत. तसेच, तुमच्यातील भावनिक बाजू या कालावधीत लोकांना दिसेल. प्रेमाचे अतूट बंध जुळून येतील. तर, काही नातेसंबंध दुरावण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला पैशांची गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी ही चांगली संधी आहे. तसेच, तुमच्या व्यवसायात देखील तुमची प्रगती दिसून येईल. नवीन ऑर्डर्स तुम्हाला मिळतील.

कर्क रास (Cancer May 2026 Monthly Horoscope)

कर्क राशीसाठी मेचा महिना सतर्कतेचा असणार आहे. या काळात जोडीदाराबरोबर छोट्या-छोट्या कारणांवरुन तुमचे वाद होऊ शकतात. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तसेच, राजकीय क्षेत्रात तुम्ही सक्रिय असाल. मे महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला काही महत्त्वाचे आणि धाडसी निर्णय घ्यावे लागू शकतात. मात्र, त्याशिवाय तुमची प्रगती होऊ शकत नाही. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना 10 वेळा विचार करा.

सिंह रास (Leo May 2026 Monthly Horoscope)

सिंह राशीसाठी मेचा कालावधी काहीसा चढ-उतारांचा असणार आहे. या कालावधीत तुम्हाला ना फायदा ना तोटा होणार आहे. तसेच, कोणतेही निर्णय घेताना समजुतीने घ्या. आर्थिक बाबतीत पैसे खर्च करताना सावधानता बाळगा. तसेच, तुमच्या मतांवर तुम्ही ठाम राहणं गरजेचं आहे. इतरांच्या वागण्याचा प्रभाव तुमच्या वागणुकीत किंवा विचारसरणीत येऊ देऊ नका. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल.

कन्या रास (Virgo May 2026 Monthly Horoscope)

कन्या राशीसाठी मेचा महिना भाग्यशाली असणार आहे. मात्र, या दरम्यान तुम्हाला काही गोष्टींची काळजी देखील घ्यायची असेल. ग्रह-नक्षत्रांची शुभ स्थिती या राशीवर आहे. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तसेच, परदेशात जाण्याची संधीदेखील तुम्हाला मिळू शकते. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. त्यामुळे जे कोणतं काम हाती घ्याल ते मनापासून पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. लग्नाचे योग लवकरच जुळून येणार आहेत.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Astrology : आज ध्रुव योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; कन्या राशीसह 'या' 5 राशींची लागणार लॉटरी, अचानक होणार धनलाभ

Author : एबीपी माझा वेब टीम

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha