मुंबई : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणामध्ये सहा जणांना अटक झाली आणि त्यानंतर यातील पॉलिटिकल कनेक्शन देखील समोर येताना दिसू लागलेली आहेत. याच अनुषंगाने सुरुवातीला आवाज उठवणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवकचे प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख (Mehboob Shaikh MPSC Exam) यांनी, सुरुवातीपासूनच महेबूब शेख, रोहित पवार या विषयावर बोलत होते एमपीएससीचा पेपर फुटलेला आहे, मात्र एमपीएससीने हे सगळं नाकारलं होतं, याबाबत आता एबीपी माझाशी महबूब शेख यांनी सविस्तरपणे प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले, आता दूध का दूध पाणी का पाणी झालं, एमपीएससी सगळं नाकारणारच, कारण याची पाळमुळे एमपीएससीमध्ये आहेत, पेपर फुटीचा जो मेन डिस्ट्रीबुटर आहे, हा एमपीएससीत बसलेला आहे, आता जी अटक झाली, ती दलालाला अटक झालेली आहे आणि ग्राहकांना अटक झाली, पण मेन म्होरक्या आहे, याचा मास्टर माइंड हा एमपीएससीमध्ये नागासारखा ठाण मांडून बसला आहे, अशी प्रतिक्रिया देखील शेख यांनी दिली आहे.(Mehboob Shaikh MPSC Exam)
Mehboob Shaikh MPSC Exam: पुण्याच्या महापौरांचे देखील ते काम सांभाळत होते
तर विद्यार्थ्यांच भविष्य हे भ्रष्टाचारी लोकांच्या हातात या सरकारने दिलं, याच्यापेक्षा वाईट अवस्था कोणती महाराष्ट्रातली, ज्या गाढवेला आता अटक केलं, त्या गाढवेच पॉलिटिकल कनेक्शन कुणासोबत आहे? भारतीय जनता पार्टीचे आमदार अभिमन्यु पवार यांचे ते निकटवर्ती आहेत, पुण्याच्या महापौरांचे देखील ते काम सांभाळत होते, ही माहिती आहे आणि त्यांच्या मार्फत हे रॅकेट पुढे गेलंय अशी देखील चर्चा जोरात आहे, कारण ज्यावेळेला त्या गाढवेच्या बायकोचं नाव मेरीटमध्ये आलं, म्हणून मी ट्वीट केलं, त्यावेळेला त्या गाढवेंचा मला फोन आला, माझ्या काही मित्रांच्या मार्फत, काही पदाधिकाऱ्यांच्या मार्फत, चार पाच वेगवेगळ्या लोकांच्या मार्फत मला फोन आले, आणि माझं नाव घेऊ नका, प्लीज, तुम्ही माझे फोटो भाजपाच्या मुख्यमंत्र्यासोबत किंवा इतर लोकांच्या सोबत आमच्या मिसेसचे फोटो ट्वीट करू नका, असं मला सांगितलं आणि मी मला ट्वीट डिलीट करा, ही सुरुवातीला विनंती केली. मी म्हटलं हे ट्वीट डिलीट होणार नाही, तुम्ही चौकशीला सामोरे जावा, तुम्हाला एवढी घाबरायची काय गरज आहे, आणि ज्या मित्रांच्या कडून मला फोन आला, त्या मित्रांनी फोन ठेवल्यावर मी त्याला सांगितलं की, बॉस 100 टक्के हा त्याच्यात सहभागी आहे, कारण कर नाही, त्याला डर कशाला? तो एवढा घाबरलाय म्हणजे, दाल में कुछ काला है, मुळात हे प्रकरण दिसत तेवढं वरवर एवढं सोपं नाहीये, हा एकच पेपर फुटलेला नाही एमपीएससीचा, अनेक पेपर फुटलेत, फक्त ऋतुजा पाटील हिचा चॅट व्हायरल झाला आणि ते व्हायरल झालेला चॅट हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांनी बघितला. त्याच्यामुळे या सरकारची इच्छा होती दाबायची, कारण या सरकारचे अनेक अभिमन्यु ह्या पेपरफुटीच्या चक्रव्यूहात अडकलेलेत आणि त्या अभिमन्युला वाचवायचं, सगळ्या चक्रव्यूहात अडकलेल्या सरकारच्या म्हणून हा सगळा प्रयत्न त्यांचा चालू होता, असंही शेख यांनी म्हटलं आहे.
Mehboob Shaikh MPSC Exam: अटक केलंय ते गाढवे कोणाच्या जवळचे आहेत?
ज्यांना अटक केलंय ते गाढवे कोणाच्या जवळचे आहेत? माझ्या जवळचे आहेत का ते? कुणाचा पीए म्हणून काम बघितलं त्यांनी, हे मला एकट्याला नाही, सगळ्यांना माहिती आहे ना, त्यांनी कुणाचं पीए म्हणून काम बघितलं आणि मग सरकार एमपीएससी सारखा एवढा मोठा पेपर फुटलेला असताना, 45000 विद्यार्थी ज्या परीक्षेत बसले, त्यांच्या भविष्याचा सौदा केला, ही काय सोपी गोष्ट नाही, अनेक विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे आम्हाला फोन आले, त्यावेळेला ते रडत होते आणि आम्ही एवढ्या कमी मेरीटमध्ये मार्क आम्हाला मिळू शकत नाही हे आत्मविश्वासाने सांगत होते, त्यांचा जो आत्मविश्वास आहे, त्यांच्या डोळ्यात जे पाणी होतं, ना ते सगळं सांगून जात होतं, आणि एवढा वेळ ही परीक्षा रद्द करायला का लागला, म्हणजे याच्यात कोणीतरी मोठे अभिमन्यु चक्रव्यूहात अडकलेले आहेत, असा गंभीर आरोप देखील शेख यांनी केला आहे.
Mehboob Shaikh MPSC Exam: सरकारने पहिल्या दिवशी अध्यक्ष आणि सचिवाला बडतर्फ करायला पाहिजे
कोणाच्या सोबत फोटो असला म्हणून तो दोषी अस एवढा अपरिपक्व राजकारण आम्ही करणार नाही. पण ज्याचे फोटो भाजपाच्या नेत्या सोबत आहेत, त्याला डायरेक्ट मुख्यमंत्र्याचा एक्सेस भेटतो, रेल करून तो माणूस मुख्यमंत्र्यांना भेटतो, सगळ्या टीम सोबत, सहजपणे मुख्यमंत्र्याला मी भेटू शकतो का? तुम्ही भेटू शकता का? अनेक आमदाराला भेटता येत नाही, पण तो माणूस काहीतरी विशेष कॅटेगरीतला असेल ना, आणि त्याच्याच बायकोला पेपर मिळाला कसा, त्याची चौकशी झाली पाहिजे, मग आम्ही म्हणतोय की शोधा ह्या चक्रव्यूहातील अभिमन्यु, तो दाखवा महाराष्ट्राला, दलालांच्या खर्चावर कारवाई नाही, याचा मुख्य म्होरक्या पाहिजे आणि जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोवर सरकारने पहिल्याच दिवशी अध्यक्ष आणि सचिवाला बडतर्फ करायला पाहिजे होतं, एमपीएससी महेंद्र हरपाळकरला का ठेवलं आणि एमपीएससीच्या अध्यक्षाला कुणाच्या शिफारशीवर त्या जागेवर बसवलं, याचा खुलासा व्हायला नको का? हे कनेक्शन आहे एमपीएससीचे अध्यक्ष, सचिव, शिफारस, गाढवेंच्याकडे पेपर, हे सगळं झांगडगुत्ता आहे, हा एकत्र आलेला आहे, आणि हा महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे, त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांची जबाबदारी आहे की, त्यांच्या निकटवर्तीयांचं नाव तिथे येत आहे, तर त्यांनी पारदर्शक चौकशीसाठी पहिलं अध्यक्ष, सचिवाला तातडीने आजच्या आज पदावरून बाजूला केलं पाहिजे, नाहीतर एमपीएससीवर जो विश्वास आहे, तो विश्वास विद्यार्थ्यांचा शून्य होईल, आणि एमपीएससी सारख्या संस्थेवरचा विश्वास कमी होणं हे महाराष्ट्राच्या हितासाठी नाही, मुख्यमंत्र्यांला वाटत असेल की, महाराष्ट्रातले पण युवक कॉकरोच आहेत, झुरळच आहेत, तर हे झुरळ तुमच्या जर चड्डीत शिरले ना, तर तुमचा पायजामा काढून घ्यायला, या झुरळांना वेळ लागणार नाही, तुम्ही युवकांच्याकडे दुर्लक्ष करू नका, त्यांच्या भविष्याशी खेळू नका, राजकारणात आरोप प्रत्यारोप होत राहतील, अशी प्रतिक्रिया देखील मेहबूब शेख यांनी दिली आहे.
Mehboob Shaikh MPSC Exam: हे सगळं व्यवस्थित कनेक्ट होईल
तुम्ही परीक्षा परत घेताय, मान्य आहे, पण ज्या मुलांनी रात्रंदिवस अभ्यास केला, त्यांचा वेळ गेला, त्यांच कष्ट गेलं, त्यांचा पैसा गेला आणि त्यांचा गेलेला वेळ हा भरून येणार आहे का? त्याची किंमत कोण मोजणार आहे? सरकार मोजणार आहे का? मग दोषी आहेत, हे काय पेपर बनवणारे नाहीत, याची सुरुवात ही एमपीएससीत झाली पाहिजे, तिथं अध्यक्ष, सचिव त्यांना कोणी बसवलं, मग गाढवेकडे कसा पेपर गेला, चौकशीत हे सगळं व्यवस्थित कनेक्ट होईल, असंही पुढे शेख म्हणालेत.
Mehboob Shaikh MPSC Exam: विद्यार्थी हे उद्याच्या महाराष्ट्राचं, देशाचे, भविष्य
आम्ही जाहीर ट्वीट केलेत आणि पोलिसांनी आम्हाला कधी चौकशीला बोलावलंच नाही, आणि आम्ही पुरावे तर ट्वीटच केले ना, आमच्याकडे जे स्क्रीनशॉट आहेत, जे लागे बांधे, जे फोटो आहेत, ते आम्ही जाहीर ट्वीट केलेत, पोलिसांनी खरंच दबावाखाली येऊ नये आणि पारदर्शक चौकशी करावी, कारण उद्या चौकशी करणाऱ्याच्या मुलाच्या देखील भविष्याचा प्रश्न आहे, ज्या दिवशी एमपीएससी वरून विश्वास उडेल त्या दिवशी या विद्यार्थ्याचे भविष्य हे अंधारात आहे, कारण विद्यार्थी हे उद्याच्या महाराष्ट्राचं, देशाचे, भविष्य आहेत, त्यांच्या भविष्याशी खेळू नका, राजकारण करू नका, याच्यात कोणीही असला तरी त्याला पाठीशी मुख्यमंत्री घालणार नाहीत, ही अपेक्षा आम्ही व्यक्त करतो, अशी अपेक्षा देखील शेख यांनी केली आहे.
Mehboob Shaikh MPSC Exam: 100 पैकी साडेसात मार्क घेणारा, डायरेक्ट 200 पैकी 200 मार्क कसा घेतो
एमएमआरडीएमध्ये 200 पैकी 200 मार्क मिळालेत, ज्यांना अगोदरच्या परीक्षेत साडेसात मार्क मिळाले 100 पैकी, अशा विद्यार्थ्यांना 200 पैकी 200 मार्क? असे भरपूर लोक आहेत, पण सात आठ लोकांचे पुरावे माझ्याकडे आले, त्यांच्या परीक्षेचे सगळे स्क्रीनशॉट माझ्याकडे आले, ते मी ट्वीट केले, म्हणजे 100 पैकी साडेसात मार्क घेणारा, डायरेक्ट 200 पैकी 200 मार्क कसा घेतो, याचा शोध एमएमआरडीने लावून, त्या इंजिनियरला ट्रेनिंगला महाराष्ट्रात, देशात पाठवावा, एवढी प्रगती कशी झाली? एमएमआरडीने आता याचा खरंतर खुलासा केला पाहिजे, पण एमएमआरडी आता चौकशी पण करायला तयार नाही, कारण काही अधिकाऱ्यांची पण मुलं आहेत, त्यांच्या मुलांची प्रगती अशी डायरेक्ट झाली, 190, 194 मार्क आणि अगोदरच्या परीक्षेत त्यांना 15 मार्क 20 मार्क तिथून डायरेक्ट एवढी मोठी प्रगती झाली, ही काही अधिकाऱ्याची मुलं आहेत, पण एमएमआरडी त्याच्यावर बोलायला तयार नाही, असं म्हणत शेख यांनी संताप व्यक्त केला आहे.
शरद पवार आणि रोहित पवारांसोबतच्या फोटोंवर काय बोलणार? - नवनाथ बन
एमपीएससी प्रकरणातील सुनील गाढवेंचा देवेंद्रजी फडणवीसांसोबत फोटो आहे म्हणून सवाल; मग शरद पवार आणि रोहित पवारांसोबतच्या फोटोंवर काय बोलणार? असं म्हणत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शरद पवार आणि रोहित पवारांसोबतचेही फोटो दाखवले. औषध निरीक्षक परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणात सुनील गाढवे यांच्या संबंधांवर चोख प्रत्युत्तर दिलं आहे. सुनील गाढवे यांचे शरद पवार आणि रोहित पवार यांच्यासोबतही फोटो समोर आले आहेत.
Author : निलेश बुधावले, एबीपी माझा

