Dailyhunt
MI vs LSG : रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय

MI vs LSG : रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर 6 विकेटनं दणदणीत विजय

ABP माझा 1 week ago

मुंबई : मुंबई इंडियन्सनं अखेर वानखेडे स्टेडियमवर विजय मिळवला आहे. रोहित शर्मा आणि रेयान रिकल्टन यांनी दमदार भागीदारी करत मुंबईच्या विजयाचा पाया रचला. यानंतर नमन धीर यानं मुंबईला विजयाजवळ पोहोचवलं.

लखनौ सुपर जायंटसनं प्रथम फलंदाजी करताना 228 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि रेयान रिकल्टन यांनी लखनौच्या गोलंदाजांची धुलाई केली. दोघांनी मुंबईचा विजय सोपाक केला.

मुंबईचा लखनौवर विजय

रोहित शर्मा आणि रेयान रिकल्टन यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 143 धावा केल्या. मुंबई इंडियन्सच्या इतिहासातील सर्वात मोठी पाचवी भागीदारी होती. रेयान रिकल्टन 83 धावांवर बाद झाला. तर, रोहित शर्मानं देखील 84 धावा केल्या. रिकल्टन यानं 6 चौकार आणि 8 षटकार मारले. तर, रोहित शर्मानं 6 चौकार आणि 7 षटकार मारले. एम. सिद्धार्थनं रोहित शर्माला बाद केलं.

रोहित शर्मा बाद झाला तेव्हा त्यांना 6 ओव्हरमध्ये 52 धावा करायच्या होत्या. सूर्यकुमार यादव देखील मोठी धावसंख्या करु शकला नाही. नमन धीर यानं मुंबईला विजयापर्यंत पोहोचवलं. मुंबईनं 18.4 ओव्हरमध्ये 4 बाद 229 धावा केल्या. लखनौ विरुद्ध झालेला विजय मुंबईसाठी तिसरा विजय ठरला. तर, त्यांचे यंदाच्या आयपीएलमध्ये 7 पराभव झाले आहेत.

लखनौ सुपर जायंटसनं आज पहिल्यांदा फलंदाजी करताना 228 धावा केल्या होत्या. यामध्ये निकोलस पूरन यानं 21 बॉलमध्ये 63 धावा केल्या. तर, 25 बॉलमध्ये 44 धावा मिशेल मार्शनं केल्या. एडन मार्करम यानं 31 धावा केल्या. 40 धावा हिम्मत सिंह यानं केल्या. मुंबईकडून कॉर्बिन बॉश यानं दोन विकेट घेतल्या. गजनफर, विल जॅक्स आणि रघू शर्माला एक एक विकेट मिळाली.

दरम्यान, रिषभ पंतच्या नेतृत्त्वातील लखनौ सुपर जायंटसचा यंदाच्या आयपीएलमधील सातवा पराभव झाला आहे. मुंबईच्या विजयामुळं गुणतालिकेत काही बदल झालेला नाही.

मुंबई इंडियन्सची प्लेईंग XI: रेयान रिकेल्टन (विकेट कीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, विल जॅक्स, राज बावा, कॉर्बिन बॉश, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह, एएम गजनफर आणि रघु शर्मा मुंबई इंडियन्स

इम्पॅक्ट सब्सः रोहित शर्मा, मयंक रावत, रॉबिन मिंज, शार्दुल ठाकुर, ट्रेंट बोल्ट

लखनौ सुपर जायंट्सची प्लेईंग इलेव्हन : मिशेल मार्श, एडेन मार्करम, रिषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), जोश इंग्लिस, निकोलस पूरन, अक्षत रघुवंशी, हिम्मत सिंह, मोहम्मद शमी, मोहसिन खान, आवेश खान आणि प्रिंस यादव,

लखननौ सुपर जायंट्स इम्पॅक्ट सब्सः मणिमारन सिद्धार्थ, दिग्वेश सिंह राठी, मयंक यादव, शाहबाज अहमद, अब्दुल समद

Author : युवराज जाधव

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha