Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
MNS and KRV: हिंदी भाषा आक्रमणाविरोधात मनसे-कन्नड रक्षक वेदिके मैदानात; कर्नाटकात ठरला 'रोडमॅप', दिल्लीत महाअधिवेशन होणार

MNS and KRV: हिंदी भाषा आक्रमणाविरोधात मनसे-कन्नड रक्षक वेदिके मैदानात; कर्नाटकात ठरला 'रोडमॅप', दिल्लीत महाअधिवेशन होणार

ABP माझा 1 week ago

MNS and KRV: मराठी भाषा (Marathi Language), मराठी अस्मिता आणि महाराष्ट्र धर्मासाठी लढा देणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) तसेच कानडी भाषा व भाषिक हक्कांसाठी कट्टरपणे लढणारी 'कन्नड रक्षक वेदिके' (Kannada Rakshana Vedike) या दोन्ही संघटना हिंदी भाषेच्या (Hindi Language) आक्रमणाविरोधातआता एकत्र आल्या आहेत.

कर्नाटकात पार पडलेल्या एका अत्यंत बैठकीत दोन्ही संघटनांच्या नेत्यांनी संयुक्त आंदोलनाचा आणि लढा उभारण्याचा रोडमॅप निश्चित केला आहे.

या बैठकीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande), मनसे सरचिटणीस योगेश परुळेकर (Yogesh Parulekar) आणि कन्नड रक्षक वेदिकेचे प्रदेशाध्यक्ष टी. ए. नारायण गौडा (T. A. Narayana Gowda) यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कर्नाटक, महाराष्ट्र तसेच देशातील इतर राज्यांमध्ये भाषा, सांस्कृतिक अस्मिता आणि बदलती लोकसंख्या यामुळे निर्माण होत असलेल्या विविध आव्हानांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

MNS and KRV: बैठकीत घेण्यात आलेले प्रमुख निर्णय

- सर्व प्रादेशिक भाषांच्या रक्षणासाठी 'इंडियन लँग्वेजेस फोरम' (Indian Languages Forum) या संयुक्त मंचाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- भारतीय भाषांचे हक्क, अस्मिता आणि हितसंबंधांच्या संरक्षणासाठी एक विशेष 10 कलमी 'कॉमन मिनिमम प्रोग्राम' तयार करून तो लवकरच प्रसिद्ध केला जाईल.

- आगामी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) 'इंडियन लँग्वेजेस फोरम'चे भव्य महाअधिवेशन योजित केले जाणार आहे.

- या अधिवेशनात महाराष्ट्र आणि कर्नाटक व्यतिरिक्त तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगणा, पुद्दुचेरी, गोवा, पश्चिम बंगाल आणि पंजाब यांसारख्या विविध राज्यांतील भाषिक प्रतिनिधींना एकत्र आणले जाईल.

- कर्नाटक आणि महाराष्ट्रासह विशेषतः दक्षिणेकडील राज्यांच्या भाषा, संस्कृती आणि अधिकारांवर होणाऱ्या आक्रमणाविरोधात एकजूट दाखवत संयुक्त आंदोलन उभारण्यावर दोन्ही संघटनांचे एकमत झाले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर बातम्या

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे म्हणाले, जात पडताळणी समिती नको; पण आरक्षण व्यवस्थेत समिती का आवश्यक? सदस्यांनी सगळंचं सांगितलं

Bajrang Sonwane Letter to Devendra Fadnavis: मराठा समाजाची अस्वस्थता वाढतेय, जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्यासाठी ठोस निर्णय घ्या; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Author : वेदांत नेब

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha