पुणे : पुण्यातील भोर जिल्ह्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणातील सगळ्यात मोठी बातमी समोर आली आहे. 28 दिवसात आरोपी विरोधात आरोप निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती आहे. नसरापूर अत्याचार (Nasrapur Girl Death) आणि हत्या प्रकरणात आरोपीविरोधात आरोप निश्चित करण्यात आली आहे.
न्यायालयाकडून आरोपीविरोधात प्राईमा फेसी (prima facie) पुरावे असल्याचे निरीक्षण न्यायालाकडून नोदवण्यात आले आहेत. आता खटल्याची रोज सुनावणी 'इन कॅमेरा' पद्धतीने होणार असल्याची माहिती समोर आली आहे.(Nasrapur Girl Death)
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला पहिल्यांदाच प्रत्यक्ष कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टात युक्तिवाद करताना आरोपीच्या वकिलांकडून विरोध करण्यात आला, मात्र पुरावे नसल्याने आरोपीवर आरोप निश्चिती करण्यात आली. पंधरा दिवसात चार्जशीट दाखल करण्यात आलं होतं. ते सादरही करण्यात आलं होतं. त्याच चार्ज शीटवर आज सुनावणी पार पडली असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणातील लैंगिक चाचणी, सीसीटीव्ही फुटेज या सगळ्याची तपासणी पुन्हा एकदा करण्यात आली, त्याचबरोबर दोषारोप पत्राची माहिती देखील यावेळी कोर्टाला देण्यात आली या आरोपीवर आरोप निश्चिती करण्यात आली आहे. आता रोज या प्रकरणाची सुनावणी 'इन कॅमेरा' पद्धतीने होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Nasrapur Girl Death : नरसापूरमध्ये नेमकं काय घडलं?
पुण्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी एक धक्कादायक घटना घडली. एका 65 वर्षीय व्यक्तीने, घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर दगडाने ठेचून तिला निर्घृणपणे संपवलं आणि नंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला. दुपारी चिमुकली न दिसल्यानं तीची शोधाशोध केल्यानंतर चिमुकली गोठ्यात मृत अवस्थेत आढळली. त्यानंतर परिसरात असलेले सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर आरोपी चिमुकलीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जाताना दिसला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.(Pune Nasrapur Girl Death)
नराधम आरोपीने वासरू दाखवतो म्हणून हात धरून त्या चिमुकलीला गोठ्यात नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. आजीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आलेल्या या मुलीच्या कुटुंबीयांनी आपल्याच मुली सोबत असं कधी घडेल असा विचारही केला नव्हता. मात्र दुपारी साडेतीन वाजताचे ते सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आणि अख्खं कुटुंब हादरलं. या घटनेनंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत पोलिसांना घेराव घातला.(Pune Nasrapur Girl Death)
इतकं गंभीर कृत्य करूनही या नराधमाला त्याचा जराही पश्चाताप झालेला नाही. ग्रामस्थांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं. तरीही आपण काहीही चुकीचं केलेलं नाही, असा दावा या नराधमाने कोर्टात केला. शनिवारी पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं. यावेळी युक्तिवादही नराधमाच्या समोरच झाला. मग न्यायाधीशांनी या नराधमाला प्रश्न विचारला, तुमची केस नेमकी काय आहे माहिती आहे का? त्यावर या नराधमाने अक्षरश: संताप येईल, असं उत्तर दिलं. ही मारामारीची किरकोळ केस आहे, असं हा असूर कोर्टात म्हणाला. मात्र, या नराधमाने केलंलं हे पहिलं नाहीतर तिसरं कृत्य आहे. याआधी पुरावे नसल्यानं तो दोन वेळा निर्दोष सुटला. त्यामुळे किमान या प्रकरणात तरी त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी प्रतिक्रिया सर्वच स्तरातून उमटत आहेत.
Author : शिवानी पांढरे

