Dailyhunt
मोठी बातमी, सुवेंदू अधिकारी यांच्या PA ला संपवलं, चार गोळ्या लागल्या, पश्चिम बंगालच्या मध्यमग्राममध्ये घडली घटना

मोठी बातमी, सुवेंदू अधिकारी यांच्या PA ला संपवलं, चार गोळ्या लागल्या, पश्चिम बंगालच्या मध्यमग्राममध्ये घडली घटना

ABP माझा 1 week ago

Chandranath Rath Suvendu Adhikari कोलकाता : पश्चिम बंगालमधील निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सुरु झालेला संघर्ष सुरुच आहे. भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची माहिती आहे.

सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं मध्यमग्राम खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालचे भाजपचे प्रमुख नेते सुवेंदू अधिकारी चंद्रनाथ रथ यांना ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तिथं पोहोचणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये गेल्या दोन दिवसात पाचवी हत्या झाली आहे.

चंद्रनाथ रथ यांच्या हत्येसंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली नाही. 24 परगणाच्या मध्यमग्राममध्ये रथ यांच्यावर गोळीबार करण्यात आला. चार राऊंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चार राऊंड फायर झाल्यानं चंद्रनाथ रथ यांचा मृत्यू झाला. रथ यांच्यावरील हल्लेखोर कोण होते यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही. यासंदर्भात पोलीस तपास अधिक माहिती समोर येईल. चंद्रनाथ रथ त्यांच्या वाहनात होते त्यावेळी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. गाडी थांबवून गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. चंद्रनाथ रथ यांच्या छातीत आणि पोटात गोळीबार झाल्याची माहिती आहे.

चंद्रनाथ रथ दीर्घकाळापासून सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत काम करत होते. चंद्रनाथ रथ यांच्यावर कोणी गोळीबार केला यासंदर्भात माहिती समोर आलेली नाही. चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांना ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथं लोकं मोठ्या प्रमाणावर जमण्यास सुरुवात झाली आहे. चंद्रनाथ रथ यांच्या वाहनावर गोळीबार झाल्याचं समोर आलं आहे.

पश्चिम बंगालच्या 24 परगाणामधील मध्यमग्राममध्ये चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळीबार करण्यात आला. दुसरीकडे सुवेंदू अधिकारी पूर्व मिदनापूरकडे निघाले होते. त्यावेळी त्यांना माहिती मिळताच ते मध्यमग्रामकडे निघाले आहेत. भाजप कार्यकर्ते आणि इतर लोक चंद्रनाथ रथ यांना ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथ दाखल होणार आहे. चंद्रनाथ रथ यांच्यावर नेमका हल्ला कोणी केला हे अद्याप समोर आलेलं नाही. रथ यांच्यावर गोळीबार करणारे मारेकारी दुचाकीवरुन आले असल्याची प्राथमिक माहिती आहे.

पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या हिंसात्मक घटनांमुळं जवळपास 500 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पश्चिम बंगालच्या किमान 8 शहरात तणाव असल्याची माहिती आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक पूर्व काळात किंवा मतदानाच्या दिवशी हिंसा झाली नव्हती. मात्र, निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसात्मक घटना घडत आहेत.

Author : युवराज जाधव

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha