MPSC Drugs inspector Exam leak अहिल्यानगर : अन्न,औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द (FDA Drug Inspector Group-B Exam) करण्यात आली आहे.
तर एमपीएससी पेपरफुटी प्रकरणामध्ये आतापर्यंत सहा जणांना अटक झाली असूनत्याचीव्याप्तीअधिकवाढण्याचीहीशक्यतावर्तवलीजातआहे. तरदुसरीकडेयाचमुद्दयावरूनराज्याचंराजकारणतापलंअसताना यातील पॉलिटिकल कनेक्शन देखील समोर येताना दिसू लागलेली आहेत. एकंदरीतयासर्वपार्श्वभूमीवरएकमोठीबातमीसमोरआलीआहे. MPSC पेपरफुटीची पहिली तक्रार देणारे ऋषिकेश गांगर्डे (Rishikesh Gangarde) आता पुन्हा नवे पुरावे देणार असल्याची माहिती समोर आली आहे. 1 सप्टेंबरला तेयाबाबतपुरावेदेतखुलासाकरणारअसल्याचीमाहितीत्यांनीएबीपीमाझाशीबोलतानादिलीय.
Rishikesh Gangarde :आयोगाची प्रतिमा मलीन झाली, अध्यक्ष आणि सचिवांनी राजीनामा दिला पाहिजे,
एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचे पेपर फुटल्याचा आरोप अहिल्यानगरच्या ऋषिकेश गांगर्डे यांनी केला होता. सुरुवातीला आयोगानं हे आरोप फेटाळले होते. सोबतच मानहानीचा गुन्हा दाखल करण्याचा देखील इशारा दिला होता. मात्र आता या प्रकरणात जवळपास सहा जणांना अटक देखील झाली आहे आणि पुनर्परीक्षा घेण्याच्या निर्णय देखील घेण्यात आला आहे. याबाबत ऋषिकेश गांगर्डे यांना विचारले असता माझ्यावर मानहाणीचा गुन्हा दाखल करण्याची भाषा करणाऱ्यांनी आता हे आरोप स्वीकारले असून कारवाई देखील केली आहे. त्यामुळे त्यांच्यामुळेच आयोगाची प्रतिमा मलीन झाली असल्याने आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Rishikesh Gangarde : भाजप नेत्यांच्या मुलांना पेपर फुटीचा फायदा, एक तारखेला जाहीररित्या सर्व पुरावे देणार
सोबतच पुनर्परीक्षा जरी होणार असली तरी पुन्हा पेपर फुटणार नाही, याची शाश्वती कोण देणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर आम्ही ज्यांच्याकडे पेपर फुटल्याचे पुरावे दिले होते, त्यांनाच अटक झाल्याने त्यांनी ते पुरावे आता नष्ट केले असतील अशी शंका गांगर्डे यांनी उपस्थित केलीआहे. सोबतच अहिल्यानगर जिल्ह्यात देखील काही भाजपच्या नेत्यांच्या मुलांना या पेपर फुटीचा फायदा झाला असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याबाबत एक (1 सप्टेंबर) तारखेला आपण जाहीररित्या सर्व पुरावे देणार असल्याचे त्यांनी म्हटलंय.
इतर महत्वाच्या बातम्या
Author : सुनील भोंगळ

