चेन्नई सुपर किंग्ससाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
संघाला पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून देणारा दिग्गज कर्णधार MS धोनी पुनरागमनासाठी सज्ज होत आहेत.
MS धोनी येत्या काही दिवसांत फिटनेस टेस्ट देणार आहे.
स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पायाला दुखापत झाल्यामुळे धोनीने या हंगामात अद्याप एकही सामना खेळलेला नाही.
दरम्यान, सीएसकेने आपल्या पहिल्या तीनही सामन्यांत पराभव पत्करला आहे.
'द इंडियन एक्सप्रेस'च्या वृत्तानुसार, फिटनेस चाचणीच्या निकालावर धोनीच्या पुनरागमनाची वेळ ठरणार आहे. सर्व काही सुरळीत झाले, तर येत्या शनिवारी चेपॉक येथे दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात तो मैदानात उतरू शकतो.
धोनीने नेट्समध्ये फलंदाजी सुरू केली असून त्याला कोणतीही अडचण जाणवत नाही.
मात्र, सीएसके व्यवस्थापन कोणताही धोका पत्करू इच्छित नसून 44 वर्षीय धोनीला घाईघाईत खेळवण्याचा विचार नाही.

