Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Mulshi Pattern 2 : आराराssss खतरनाक..; प्रवीण तरडेंकडून मुळशी पॅटर्न 2 सिनेमाची घोषणा, कशावर आधारीत असणार सिनेमा? सांगून टाकलं

Mulshi Pattern 2 : आराराssss खतरनाक..; प्रवीण तरडेंकडून मुळशी पॅटर्न 2 सिनेमाची घोषणा, कशावर आधारीत असणार सिनेमा? सांगून टाकलं

ABP माझा 1 month ago

Mulshi Pattern Part 2: मराठी सिनेसृष्टीत सध्या 'राजा शिवाजी'नंतर (Raja Shivaji) 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) या सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे. चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे सिनेमागृहात 'देऊळ बंद 2' ला प्रेक्षकांकडून मिळत असलेला प्रतिसाद.

'देऊळ बंद'ला प्रेक्षकांचा (Entertainment) जबरदस्त प्रतिसाद मिळाला. 11 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या या सिनेमानं जबरदस्त बॉक्स ऑफिस (Box Office Collection) कलेक्शन केलं होतं. दरम्यान, 'देऊळ बंद 2'ला हा प्रेक्षकांनी पाठिंबा दिला आहे. 'देऊळ बंद 2' सिनेमागृहात धुमाकूळ घालत असताना आता प्रवीण तरडेंनी प्रेक्षकांना खास सरप्राईज दिलं आहे. त्यांनी सुपरहिट 'मुळशी पॅटर्न'चा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. या बातमीमुळे प्रेक्षकांनाही आनंद झाला आहे.

'देऊळ बंद 2' नंतर प्रवीण तरडेंची मोठी घोषणा (Pravin Tarde Officially Announces Mulshi Pattern 2)

प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' या सिनेमाला चाहत्यांचा पाठिंबा आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात प्रेक्षकांची हाऊसफूल्ल गर्दी जमतेय. दरम्यान, 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर प्रवीण तरडेंनी प्रेक्षकांसाठी खास सरप्राईज दिलं आहे. त्यांनी 'मुळशी पॅटर्न'च्या दुसऱ्या भागाबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. 'मुळशी पॅटर्न 2' हा सिनेमा इतका खतरनाक असेल की, तुमच्या अंगावर काटा येईल', असे प्रवीण तरडे म्हणाले.

'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण तरडे म्हणाले, 'देऊळ बंद 2 नंतर शक्यतो मी मुळशी पॅटर्न पार्ट 2कडे मी वळेन. मुळशी पॅटर्न पार्ट 1 या सिनेमातून मी शेती विकायची नसते, राखायची असते असं सांगितलं होतं. मुळशी पार्ट 2 मधून, तुझ्या माझ्या घराचं स्वप्न महाग का झालं? याचं उत्तर मुळशी पॅटर्न 2 या सिनेमातून मिळणार', असं प्रवीण तरडे म्हणाले.

प्रवीण तरडेंनी आगामी सिनेमाचं टायटलही सांगितलं (Pravin Tarde Set To Return With Mulshi Pattern 2)

'सिनेमाचं नावच आहे, मुळशी पॅटर्न पार्ट 2 - तुमच्या घराच्या भिंतीतल्या वाळूची गोष्ट.. हा सिनेमा इतका खतरनाक असेल, इतका जबरदस्त असेल.. की अंगावर काटे आणि शहारे येईल', असं प्रवीण तरडे म्हणाले. 'देऊळ बंद 2 या सिनेमाची पब्लिसीटी झाली की, मीटिंग करायची आहे..लवकर सुरू करायचं आहे..', असंही प्रवीण तरडे म्हणाले. दरम्यान, प्रवीण तरडेंनी दिलेल्या हिंटनंतर प्रेक्षकांनी 'देऊळ बंद 2' सिनेमा पाहण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे. हा सिनेमा वाळूमाफियांवर आधारीत असेल का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

इतर बातम्या:

बॉक्स ऑफिसवर 'दृश्यम 3'चा ताबा, सस्पेन्स थ्रिलर सिनेमानं 9 व्या दिवशी किती कोटींचं कलेक्शन केलं?

ABP माझाच्या बातम्या LIVE..

Author : एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha