Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Mumbai Accident Malad: मालाडमध्ये महिला वकिलाला उडवलं, पण चालकाला 15 हजारांत सोडलं, आता भाजपचा नगरसेवक मैदानात

Mumbai Accident Malad: मालाडमध्ये महिला वकिलाला उडवलं, पण चालकाला 15 हजारांत सोडलं, आता भाजपचा नगरसेवक मैदानात

ABP माझा 1 week ago

Mumbai Accident Malad: मुंबईतील मालाड पश्चिमेकडील एस. व्ही. रोड आणि मामलेदारवाडी जंक्शनवर रविवारी एक भीषण अपघात घडला होता. सिग्नलवर थांबलेल्या स्कुटीसह तीन ऑटो रिक्षांना एका अनियंत्रित कारने जोरदार धडक (Road Accident news) दिली.

या दुर्दैवी अपघातात स्कुटीवर मागे बसलेल्या 34 वर्षीय महिला वकील प्रियंका मयांक सत्रा यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती आणि तीन रिक्षाचालकांसह सहा जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी कार चालक 70 वर्षीय कृष्णा चमणकर याला अटक केली होती. मात्र, त्याला कोर्टात हजर करुन 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्त करण्यात आले होते. या घटनेमुळे संताप व्यक्त होत असतानाच आता या प्रकरणात मुंबईतील भाजप (BJP) नगरसेवकाची एन्ट्री झाली आहे. भाजपचे नगरसेवक प्रवीण छेडा (Pravin Chheda) यांनी या प्रकरणात मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. (Mumbai Crime news)

या प्रकरणात पोलिसांनी आरोपी कृष्णा चमणकर याला व्हीआयपी ट्रिटमेंट दिली. यात हत्येचा गुन्हा दाखल व्हावा आणि या प्रकरणी आरोपीसह त्याला मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी भाजपचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी केली आहे. मयत प्रियंका सत्रा या प्रवीण छेडा यांच्या नातेवाईक आहेत. याबाबत प्रवीण छेडा यांनी पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहे. तसेच आज ते मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेणार आहेत.

या अपघातामुळे प्रियंका सत्रा यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रियांका सत्रा यांच्यावर अपघाताच्याच रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रियांका यांना आठ वर्षांची मुलगी आणि चार वर्षांचा मुलगा आहे. हे दोघेही आईच्या अचानक जाण्याने धाय मोकलून रडत होते. या अपघातात मयांक सत्रा हेदेखील गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, प्रियांका यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी तिला शेवटचं पाहता यावं, यासाठी मयांक सत्रा हे गंभीर जखमी असूनही व्हिलचेअरवरुन स्मशानभूमीत आले होते. हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

Mumbai Accident Malad: बायकोला शेवटचं पाहायला जखमी मयांक व्हीलचेअरवर स्मशानभूमीत, मालाडमधील अपघाताने साथ कायमची तुटली, प्रियकांच्या अंत्ययात्रेला डोळ्यात पाणी आणणारं दृश्य

Mumbai Crime Accident Bandra: मुंबईतील धनाढ्य महिलने मोबाईलवर बोलताना चिमुरड्याला उडवलं, पोलिसांनी पकडताच रावल फॅमिलीची साक्षीदाराला पैशांची ऑफर, वांद्रे अपघातप्रकरणात नवा ट्विस्ट

Author : रोहित धामणस्कर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha