Mumbai Accident: मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मालाड परिसरात एक भीषण अपघात (Road Accident) घडल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी रात्री घडलेल्या या भीषण अपघातामध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल 20 जण जखमी झाल्याची माहिती आहे.
यापैकी एका महिला वकिलाचा (Lawyer) मृत्यू झाला आहे. या महिलेचे नाव प्रियांका सत्रा असे आहे. तर आणखी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. मालाड पश्चिम येथील रहिवासी असलेल्या अॅड. प्रियांका मयंक सत्रा यांचा जागीच मृत्यू झाला. (Mumbai Crime news)
प्राथमिक माहितीनुसार, मालाड पोलीस ठाणे हद्दीत एस व्ही रोड, मामलेदार वाडी रोड जंक्शन येथे रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. सदर संदेश मिळताच सदर ठिकाणी ठाणे पोलीस उपनिरीक्षक जाधव, रात्रपाळी पोलीस निरीक्षक लोखंडे, स्टाफसह रवाना झाले. सदर ठिकाणी एमजी विन्सर क्रमांक MH 02 GJ 2722 या वाहनाचा वाहनचालक नामे कृष्णा शांताराम चमनकर (वय 70) याने तीन रिक्षा आणि एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत बाईकस्वार आणि रिक्षात बसलेले पाच जण असे एकूण सहा जण जखमी झाले होते. या सगळ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी एका महिला वकिलाचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी वाहनचालक कृष्णा चमणकर याला ताब्यात घेतले. त्याला तातडीने शताब्दी रुग्णालयात नेऊन त्याची तपासणी करण्यात आली. सदर घटनेत एक महिला मयत असून सदर बाबत तात्काळ मालाड पोलीस ठाणे गु. रजि. क्रमांक 1469/2026 कलम 106(1), 281, 125 (A)(B), भारतीय न्याय संहितासह कलम 184 मोटर वाहन कायदा प्रमाणे नोंद करण्यात आला आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले असून, त्यापैकी एका जखमीची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. यातील आरोपीस सदर घेण्यात अटक करण्यात आली असून सदर अटक आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे.
Mumbai Accident: मुंबईत धनाढ्य महिलेच्या भरधाव कारने चिमुरड्याला उडवलं
मुंबईत रविवारी वांद्रे परिसरात एका भरधाव कारची धडक बसल्याने आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वांद्रे पोलिसांकडून (Bandra Police) आरोपी महिला कारचालक महिला मेघा रावल हिच्याविरोधात गुन्हा दाखल करुन तिला अटक करण्यात आली होती. मेघा रावल हिच्यावर मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा अतिवेगाने व निष्काळजीपणे गाडी चालवण्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
Author : सचिन गाड

