Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Mumbai Crime News: रात्री 11-12 वाजता अंधारात शॅडोला पकडलं अन्...; मालाडमध्ये पाळीव कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; माणुसकीला काळिमा फासणारी घटना

Mumbai Crime News: रात्री 11-12 वाजता अंधारात शॅडोला पकडलं अन्...; मालाडमध्ये पाळीव कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; माणुसकीला काळिमा फासणारी घटना

ABP माझा 2 weeks ago

मुंबई: मुंबईतील मालाड (पश्चिम) परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ४५ वर्षीय व्यक्तीने भटक्या कुत्र्यावर (Mumbai Crime News) लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

एका पशुवैद्यकीय दवाखान्याबाहेर (Veterinary Clinic) ही घटना घडली असून, दवाखान्यातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.(Mumbai Crime News)

Mumbai Crime News : नेमकी घटना काय?

ही घटना २६ एप्रिल रोजी रात्री उशिरा घडली. मालाड पश्चिमेकडील एका पशुवैद्यकीय दवाखान्यात रात्री मोठी गर्दी होती. त्याचवेळी रुक्साना शेख नावाची महिला आपल्या पाळीव मांजरीवर उपचार करण्यासाठी तिथे आली होती. रात्री ११.३० च्या सुमारास उपचार करून दवाखान्यातून बाहेर पडत असताना, रुक्साना यांना फूटपाथवर एक व्यक्ती एका कुत्र्यावर लैंगिक अत्याचार करताना दिसली. त्यांनी तातडीने आरडाओरडा करून दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना बोलावले.(Mumbai Crime News)

Mumbai Crime News : त्याचे नाव 'शॅडो' असून तो जवळच असलेल्या एका डेअरी मालकाचा कुत्रा

ज्या कुत्र्यावर अत्याचार करण्यात आला, त्याचे नाव 'शॅडो' असून तो जवळच असलेल्या एका डेअरी मालकाचा होता. रुक्साना शेख आणि दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी त्या नराधमाला जाब विचारला असता, त्याने उलट त्यांच्यावरच ओरडून "हा कुत्रा तुमचा नाही," असे म्हणत हुज्जत घातली. यावेळी तो कुत्रा वेदनेने विव्हळत होता.(Mumbai Crime News)

Mumbai Crime News : आरोपी नरेश राजाराम चांदुलकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले

दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी तातडीने डेअरी मालकाला बोलावून घेतले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. नरेश चांदुलकर (रा. हनुमान टेकडी, मालाड पूर्व) असे या ४५ वर्षीय आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध 'प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६०' (Prevention of Cruelty to Animals Act) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपी नरेश राजाराम चांदुलकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मालाड पोलिसांकडून गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे, तर प्राणीप्रेमींकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

Author : सत्यम सिंह

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha