Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबई पोर्ट परिसरात भीषण आग, कार्गो उचलताना क्रेननं अचानक घेतला पेट, दोन्ही ऑपरेटर गंभीर जखमी

मुंबई पोर्ट परिसरात भीषण आग, कार्गो उचलताना क्रेननं अचानक घेतला पेट, दोन्ही ऑपरेटर गंभीर जखमी

ABP माझा 1 week ago

Mumbai Port Fire News : मुंबई पोर्ट परिसरात भीषण आग (Mumbai Port Fire) लागल्याची घटना घडली आहे. यामुळं मोठी खळबळ उडाली आहे. कार्गो उचलत असताना क्रेनने पेट घेतला आहे. या दुर्घटनेत दोन्ही क्रेन ऑपरेटर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

घटनेची माहिती मिळताच मुंबई पोर्ट ट्रस्टवरील अग्निशम दल दाखल झाले होते. तात्काळ आगीवर ताबा मिळवण्यात यश मिळालं आहे.

घर्षणामुळे क्रेनला आग लागली

BPS या पोर्ट मधे उभी असलेली व्हिएंना ही बार्बाडोस देशाचा फ्लॅग असलेल्या वेसल मधील 140 मेट्रिक टन वजन असलेला कार्गो बरकत या कंपनीच्या 2 क्रेन च्या सहायाने वेसल मधून उचलत असताना एका क्रेनचा कार्गोला बांधलेला पट्टा इम्बैलेंस झाल्यामुळे निघाल्याने त्याचा भार दुसऱ्या क्रेन वर आल्याने क्रेन जमिनी पासून उचलली गेली व त्याचा पुढील टेलिस्कोपिक बूम वेसल वर आदळला. त्यामध्ये घर्षणामुळे क्रेनला आग लागली. सदरवेळी मुंबई पोर्ट येथील अग्निशमन दल येवून त्यांनी तत्काळ आग विजवली आहे. या घटनेमध्ये बरकत क्रेन मधील क्रेन ऑपरेटर रणजीतसिंग आणि दुसरा ऑपरेटर निशांत सिंह जखमी असून त्यांना उपचारकामी सेंट जॉर्ज हॉस्पिटल येथे नेण्यात आले आहे. सदर घटनेची चौकशी सुरू आहे.

घटनेची चौकशी सुरु करण्यात आल्याची माहिती

दरम्यान, मुंबईतील पोर्ट परिसरात अचानक भीषण आग लागल्याच्या घटनेमुं परिसरात खळबळ उडाली आहे. घर्षणामुळं क्रेनला आग लागल्याची माहिती मिळत आहे. या आगीत दोन क्रेन ऑपरेटर जखमी झाले आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, या घटनेची चौकशी सुरु करण्यात आल्याची माहिती देखील मिळत आहे.

नवी मुंबईतील रबाळे औद्योगिक वसाहती मधील गादी बनवण्याच्या गोदमाला भीषण आग

नवी मुंबईत देखील एक धक्कादायक घटना घडली आहे. नवी मुंबईतील रबाळे औद्योगिक वसाहती मधील गादी बनवण्याच्या गोदमाला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. रबाळे एमआयडीसी मधील जेके ट्रेडर्स R-823 मध्ये ही आग लागली होती. एमआयडीसी अग्नीशमन दलाने घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या आगीत कंपनी मधील सर्व साहित्य जळून खाक झाले असून परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. दरम्यान, आगीत गादी बनवण्याच्या गोदामातील साहित्य जळून खाक झाले आहे. त्यामुळं मोठा आर्थिक फटका बसला आहे.

Author : सचिन गाड

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha