Mumbai Rain News Update : मुंबईलाशनिवारी (4 जुलै) मुसळधार पावसानं (Mumbai Rain)अक्षरशःझोडपूनकाढलंआहे. अनेकभागातदिवसभरकोसळलेल्यामुसळधारपावसामुळे (Rain) जनजीवनविस्कळीतझाल्याचेबघायला मिळाले असून याचा फटका अनेक भागाती ल नागरिकांना बसला आहे . अशातच आज सकाळपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचं चित्र आहे.
काल (शनिवारी 4 जुलै) शहरासाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला होता आणि आजही हवामान खात्याने (IMD) मुंबईसाठी रेड अलर्ट कायम ठेवला आहे. अशातच सध्या दक्षिण मुंबईच्या आकाशात दाट काळे ढग दाटलेले आहेत. समुद्र खवळलेला आहे, तर धुक्याच्या चादरीमुळे उंच इमारतीही अंशतः झाकोळून गेल्या आहेत. वातावरणात पावसाची शक्यता कायम असली तरी सध्या दक्षिण मुंबई, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरात कुठेही पाऊस पडत नाही. मात्र रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असून नागरिकांनीही आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र बऱ्यापैकी विश्रांती घेतलेल्यापावसाचा दुपारनंतर जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. (Mumbai Rain News Update)
Nalasopara Rain: नालासोपारा, वसई-विरारमध्ये पावसाचा कहर, लोकल सेवेवर परिणाम
नालासोपारा, वसई-विरारमध्ये काल (4 जुलै) पावसाने माजवलेल्या कहराचा इफेक्ट आजही जाणवत आहे. काल सायंकाळ पासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत. वसई विरार नालासोपारा मधील अनेक भागात रस्त्यावर पाणी साचलेलं आहे. पाणी अजूनही ओसरलेलं नाही. अनेक सोसायटीच्या आवारात पाणी साचलं आहे. काही ठिकाणी नऊ तास झालेत, मात्र पाणी ओसरलं नसल्याने लाईट गेली आहे. पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा रेल्वे स्थानकातील रेल्वे रुळावर पाणी ओसरलं असून लोकल सेवा पाच मिनिटं उशिराने धावत आहे. आजही पालघरसह वसई विरार शहरात रेड अलर्ट आहे. आजही मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजही नागरिकांच्या अडचणी वाढू शकतात.
Mumbai Rain : खुद्द महापौरांच्याच प्रभागात मध्य रात्री झाड कोसळून पाच गाड्या चिरडल्या
खुद्द महापौरांच्याच प्रभागात मध्य रात्री झाड कोसळून पाच गाड्या चिरडल्या गेल्या आहेत. घाटकोपर पूर्व येथील विक्रांत सर्कल जवळ एक भले मोठे झाड रात्री 12 वाजताच्या दरम्यान कोसळले. या झाडाखाली इथे पार्क करण्यात आलेल्या पाच गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहाणी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हे झाड कापून बाजूला केले आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला आहे. अशीभीतीआताव्यक्तकरण्यातआलीआहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Author : इशान देशमुख

