Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Mumbai Rain News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुसळधार पावसामुळे तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, सध्याच्या घडीला किती टक्के पाणीसाठा?

Mumbai Rain News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुसळधार पावसामुळे तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, सध्याच्या घडीला किती टक्के पाणीसाठा?

ABP माझा 1 week ago

Mumbai Rain News: राज्यभरात गेल्या 24 तासांपासून पावसाने (Maharashtra Rain) रौद्ररूप धारण केले असून अनेकभागात पावसाचे जोरदार धुमशान सुरू आहे. याच दरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) आणि रायगड (Raigad) जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' (Red Alert) जारी केली आहे.

पुढील 3 तासांत या भागात 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह (Gusty Winds) अत्यंत तीव्र मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुंबईकरांसाठी एकपावसासंदर्भात आनंदाची बातमी समोरआलीआहे. मुंबईतसततकोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तलावांमधील (Mumbai Dam Water Storage) पाणीसाठ्यात मोठी वाढ झालीआहे. गेल्या 24 तासात जलाशयातील पाणीसाठ्यात 3.78% वाढ झाली आहे. (Heavy Rain Maharashtra)

Mumbai Rain news: मुंबईच्या सात तलावात गेल्या 24 तासात जलाशयातील पाणीसाठ्यात 3.78% वाढ

मुंबईच्या सात तलावांतील पाणीसाठा 13.19 टक्क्यांवर गेलाअसून गेल्या वर्षी याच दिवशी हाजलसाठा 54.27 टक्के होता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये आज (5 जुलै) सकाळी 6 वाजेपर्यंत 1 लाख 90 हजार 898 दशलक्ष लिटर (ML) इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. हा एकूण क्षमतेच्या 13.19 टक्के आहे. गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होत असली, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साठा तब्बल 5 लाख 94 हजार 959 ML ने कमी आहे. त्यामुळेअद्यापहीदमदारपावसाचीगरजअसणारआहे.

तलावनिहाय स्थिती (Mumbai Dam Water Storage)

-भातसा - ७१,२२१ ML (९.९३%)

-अपर वैतरणा - ९,७८० ML (४.३१%)

-मोडकसागर - ३४,५८३ ML (२६.८२%)

- तानसा - १६,०६७ ML (११.०७%)

-मिडल वैतरणा - ३१,८७० ML (१६.४७%)

-विहार - २३,११८ ML (७९.८५%)

-तुळशी - ५,२६० ML (६५.३७%)

Sangli Rain: वारणा नदीची पाणी पातळी वाढ; चांदोली धरणातील पाणीसाठा 13.36 टी.एम.सीवर

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात सलगच्या पावसामुळे वारणा नदीची पाणीपातळी वाढू लागली असून सध्या वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे. दुसरीकडे चांदोली पाणलोट क्षेत्रात देखील सलगच्या पावसामुळे चांदोली धरणाचा पाणीसाठा वाढून तो 13.36 टी.एम.सी. इतका झाला आहे. चांदोली धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून चांदोली धरणातून वारणा नदीपात्रात 100 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे देखील वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. दरम्यान, वाढत्या पाण्यामुळे वारणा नदीवरील कोकरूड-रेठरे, मांगले-सावर्डे आणि चिकुर्डे येथील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले असून त्यावरील वाहतूक तातडीने बंद करण्यात आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Author : अभिषेक मुठाळ

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha