Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Mumbai Rain Updates: मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; तिन्ही मार्गावरच्या लोकल उशिराने, सखल भागात साचलं पाणी, मान्सूनचे A टू Z अपडेट्स

Mumbai Rain Updates: मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; तिन्ही मार्गावरच्या लोकल उशिराने, सखल भागात साचलं पाणी, मान्सूनचे A टू Z अपडेट्स

ABP माझा 1 week ago

Mumbai Rain Updates: मुंबईमध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी (Mumbai Rains) लागली आहे. हवामान खात्याने दिलेला अंदाज आज प्रत्यक्षात उतरल्याचे चित्र आहे. पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि दक्षिण मुंबईसह संपूर्ण शहरात सध्या पावसाचा जोर कायम आहे.

अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असून, मुंबईकरांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी- (Mumbai Rain Updates)

मुंबईत पहाटेपासूनच शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार सरी कोसळत असून पावसाचा जोर कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून आकाश ढगाळ आहे. हवामान विभागाने मुंबईत पुढील काही तासांतही मध्यम ते जोरदार, तर काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पश्चिम उपनगरात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस- (Mumbai Rain News)

मुंबईसह पश्चिम उपनगरात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे या सर्व परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. जोरदार पाऊस असल्यामुळे उपनगरात काही सखल भागात पाणी भरायला सुरुवात झाली आहे. असंच जोरदार पाऊस सुरू राहिला तर सकाळची वेळ आहे, मोठा संख्यांमध्ये मुंबईकर चाकरमानी कामासाठी निघणार आहे. या पावसाच्या फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे.

पावसाचा मुंबई लोकल वाहतुकीला फटका- (Mumbai Local Train Updates)

मुंबईत रात्रभर पावसाची संततधार सुरु आहे. पावसाचा लोकल वाहतुकीला फटका बसला आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल 10-15 मिनिटं उशिरानं धावत आहे. पश्चिम मार्गावरील लोकल 15-20 मिनिटं उशिरानं सुरु आहे. तर रस्ते वाहतुकीवर सध्या तरी पावसाचा कोणताही परिणाम नाही.

अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलं- (Mumbai Rain Marathi News)

अंधेरी सबवेमध्ये मुसळधार पावसामुळे सुमारे दोन फूट पाणी साचले होते. पाणी उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून परिस्थितीत हळूहळू सुधारणा होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ सबवेतील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला असून वाहनांची ये-जा पूर्ववत सुरू झाली आहे.

पावसाच्या सगळ्या अपडेट्स, VIDEO:

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha